saurabh gokhale esakal
Premier

Swatantra Veer Savarkar: "एका अमराठी माणसानी..."; रणदीपचा 'स्वातंत्र्यवीर सावरकर' चित्रपट पाहिल्यानंतर मराठमोळ्या अभिनेत्यानं शेअर केली पोस्ट

Swatantra Veer Savarkar: एका अभिनेत्यानं 'स्वातंत्र्य वीर सावरकर' या चित्रपटाबद्दल सोशल मीडियावर शेअर केली आहे. या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

priyanka kulkarni

Swatantra Veer Savarkar: 'स्वातंत्र्य वीर सावरकर' (Swatantra Veer Savarkar) हा चित्रपट 22 मार्च रोजी रिलीज झाला. या चित्रपटाचं अनेकांनी कौतुक केलं. चित्रपटातील रणदीप हुड्डाच्या (Randeep Hooda) अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. अशातच आता एका अभिनेत्यानं 'स्वातंत्र्य वीर सावरकर' या चित्रपटाबद्दल सोशल मीडियावर शेअर केली आहे. या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

सौरभ गोखलेनं शेअर केली पोस्ट

अभिनेता सौरभ गोखलेनं इन्स्टाग्रामवर 'स्वातंत्र्य वीर सावरकर' या चित्रपटाचं पोस्टर शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, "रणदीप हुड्डा या माणसाच्या डेडिकेशन ला सलाम आहे. साक्षात याने तात्याराव समोर उभे केलेत. ही व्यक्तिरेखा तो जगलाय. वीर सावरकरांचं संपूर्ण आयुष्य आणि कार्य 2 तासात दाखवणं हे केवळ अशक्य आहे. आणि आत्ताची पिढी या व्यक्तिमत्वापासून ठरवून तोडण्याचा आटोकाट प्रयत्न चालू असण्याच्या काळात एका अमराठी माणसानी प्रचंड अभ्यास करून ही व्यक्तिरेखा लोकांसमोर उभ करणं हे अत्यंत धाडसाचं आणि अभिमानास्पद कार्य ! नतमस्तक ! अमित सियाल , राजेश खेरा, अंकिता लोखंडे आणि इतर सर्वांची कामेही अप्रतिम ! न चुकता हा चित्रपट प्रत्येकाने बघा !"

सौरभ गोखलेनं कालजयी सावरकर या शॉर्ट फिल्ममध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांची भूमिका साकारली आहे. त्याला राधा ही बावरी या मालिकेमुळे विशेष लोकप्रियता मिळाली. सौरभ हा मी नथुराम गोडसे बोलतोय या नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीला आला.

'स्वातंत्र्य वीर सावरकर' चित्रपटाची स्टार कास्ट

रणदीप हुड्डा यांनी 'स्वातंत्र्य वीर सावरकर' या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून रणदीप हुड्डा यांनी वीर सावरकरांची भूमिका साकारली आहे. अंकिता लोखंडे ,अमित सियाल यांनी देखील या चित्रपटात महत्वाची भूमिका साकारली आहे. 'स्वातंत्र्य वीर सावरकर' हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT