Taapsee pannu esakal
Premier

Taapsee Pannu: गुपचूप लग्न केल्याची चर्चा सुरु असताना तापसीचा 'तो' फोटो व्हायरल; नेटकऱ्यांना पडले अनेक प्रश्न

Taapsee Pannu: तापसीचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

priyanka kulkarni

Taapsee Pannu: अभिनेत्री तापसी पन्नू (Taapsee Pannu) ही सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. तापसीने तिचा लाँगटाइम बॉयफ्रेंड मॅथियास बो याच्यासोबत लग्न केलं आहे, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर होत आहे. तापसीने उदयपूरमध्ये मॅथियास बोसोबत लग्नगाठ बांधली आहे, असं म्हटलं जात आहे. अशातच आता तापसीचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

तापसी पन्नू आणि मॅथियास बो यांचे लग्न 23 मार्च रोजी उदयपूरमध्ये झाले आहे, असं म्हटलं जात आहे. पण तापसी आणि मॅथियासने त्यांच्या लग्नाचा कोणताही फोटो सोशल मीडियावर शेअर केला नाही. मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत तापसी आणि मॅथियास यांचा लग्नसोहळा पार पडला, असं म्हटलं जात होतं. अशातच आता तापसीच्या होळी सेलिब्रेशनचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये तापसीसोबतच मॅथियास देखील दिसत आहे.

तापसी आणि मॅथियासचा फोटो व्हायरल

ब्लर (2022) या चित्रपटामध्ये तापसी पन्नूसोबत काम केलेल्या अभिलाष थपलियाल या अभिनेत्यानं 25 मार्च रोजी सोशल मीडियावर होळी सेलिब्रेशनचा फोटो शेअर केला. या फोटोमध्ये तापसी, मॅथियास बो दिसत आहे. फोटोमध्ये तापसीनं सिंदूर लावलेलं दिसत आहे.

नेटकऱ्यांना पडला प्रश्न

तापसी आणि मॅथियास यांचा सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोमध्ये तापसीनं सिंदूर लावलेलं दिसत आहे. या फोटोला एका नेटकऱ्यानं कमेंट केली, "तापसीचं खरंच लग्न झालं आहे का?" तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, "तापसीनं सिंदूर लावलं आहे का?"

एका पॉडकास्टमध्ये तापसीने सांगितले होते की, तिची आणि मॅथियासची भेट तिच्या बॉलिवूड डेब्यूदरम्यान झाली होती आणि तेव्हापासून दोघेही एकत्र आहेत. तापसीचा डंकी हा चित्रपट गेल्या वर्षी रिलीज झाला. आता तापसीच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND, 5th Test: अर्शदीपचे पदार्पण होणार का अन् बुमराह खेळणार की नाही? शुभमन गिलने सर्वच सांगितलं; म्हणाला..

राजेश खन्नांच्या मृत्यूनंतर घरात सापडलेल्या ६४ बंद बॅग; काय होतं त्यात? सुपरस्टारची ती इच्छा अपूर्णच राहिली

Latest Marathi News Updates : सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरणात प्रकाश आंबेडकरांनी केलं मोठं विधान, म्हणाले...

Praniti Shinde: राहुल गांधींसमोर चमकोगिरी करण्यासाठी प्रणिती शिंदेंचे देशद्रोही वक्तव्य; भाजप जिल्हाध्यक्षांचा घणाघात

Fishing Ban : मच्छिमारांच्या मृत्यूला लाचखोर अधिकारी जबाबदार! महाराष्ट्र प्रदेश फिशरमन काँग्रेसचे मुख्य समन्वयक मिल्टन सौदिया यांचा आरोप

SCROLL FOR NEXT