taapsee pannu On Preity Zinta  sakal
Premier

तापसी पन्नूचं मुँह मियाँ मिट्ठू! प्रीती झिंटासोबत केली स्वतःची तुलना; म्हणते- तिच्यासारखी दिसते म्हणूनच...

Taapsee Pannu Viral Statement: तापसी पन्नू पुन्हा एकदा तिच्या एका विधानामुळे चर्चेत आहे. यात तिने स्वतःची तुलना थेट प्रीती झिंटासोबत केली आहे.

सकाळ डिजिटल टीम

Taapsee Pannu: लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू अभिनयासोबतच तिच्या बिनधास्त बोलण्यासाठी ओळखली जाते. तिने २०१३ साली डेविड धवन यांच्या 'चश्मेबद्दूर' या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं होतं. तिने 'पिंक', 'थप्पड़', 'मुल्क' और 'हसीन दिलरुबा' यांसारखे हिट चित्रपट दिले. काही महिन्यांपूर्वीच तापसी लग्नबंधनात अडकली. आता पुन्हा एकदा तापसी सोशल मीडियावर चर्चेत आहे त्याचं कारण आहे तिने केलेलं एक विधान. एका मुलाखतीत तापसीने स्वतःची तुलना थेट अभिनेत्री प्रीती झिंटासोबत केली आहे.

काय म्हणाली तापसी?

तापसीने नुकतीच शिखर धवन याच्या 'धवन करेंगे विथ शिखर धवन' या कार्यक्रमात हजेरी लावली. या कार्यक्रमात बोलताना तापसीने स्वतःचं कौतुक केलं आणि स्वतःच्या दिसण्याची तुलना प्रीती झिंटासोबत केली. ती म्हणाली, 'मला मुळातच बॉलिवूडमध्ये यामुळे आणलं गेलं कारण मी प्रीती झिंटासारखी दिसते. माझा चेहरा बऱ्यापैकी तिच्या चेहऱ्यासारखा आहे. त्यांच्यात खूप पॉझिटिव्ह एनर्जी आहे आणि हे तुम्हाला चांगलंच ठाऊक आहे. मला वाटतं की मला त्यांच्या प्रतिष्ठेला शोभेल असं काम केलं पाहिजे. कारण मी त्यांच्या नावामुळे इंडस्ट्रीमध्ये आली. त्यामुळे मी कायम त्यांच्या सारखं बनण्याचा प्रयत्न केला आहे.

तापसीने प्रीतीला बुद्धिमान आणि उत्साही म्हणत तिचं कौतुक केलं आहे. तिचं हे वक्तव्य सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनेक नेटकरी तापसी तिच्याच तोंडाने तिचं कौतुक करत आहे असं म्हणत तिची थट्टा करत आहेत. तापसीने यावर्षी बॅडमिंटन कोच मॅथियस बोशी उदयपूरमध्ये लग्नगाठ बांधली. तिच्या कामाबद्दल सांगायचं तर ती शेवटची राजकुमार हिरानी यांच्या 'डंकी' चित्रपटात शाहरुखसोबत दिसली होती. आता ती लवकरच 'फिर आई हसीन दिलरुबा' मध्ये दिसणार आहे. यात ती विक्रांत मेस्सी आणि सनी कौशल यांच्यासोबत दिसणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharmendra Pradhan Video: धर्मेंद्र प्रधानांचं जंगी स्वागत; राजीनाम्यानंतर पहिल्यांदाच संसदेत आले; BJP च्या खासदारांनी पाहा काय केले...

Vaibhav Sooryavanshi: रोहितसोबत वैभव सूर्यवंशीनेच सलामीला यावं! माजी दिग्गजाचा मोठा सल्ला, गिलबाबतही केलं मोठं वक्तव्य

देवदूत! पुरात अडकलेल्या चिमुरड्यासाठी ५ जणांनी लावली जीवाची बाजी; काळजाची धडधड वाढवणारा, Video Viral

Goa Casino Industry : गोव्यातील वादग्रस्त कॅसिनो आता महाराष्ट्राच्या सीमेवर? नव्या ठिकाणांचा सिंधुदुर्गात शोध, निवडणुकीआधी भाजप सरकारवर मोठा दबाव!

Latest Marathi News Live Update: पंजाबचे मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालक यांना नोटिसा बजावल्या

SCROLL FOR NEXT