mathias boe esakal
Premier

Mathias Boe: ऑलिम्पिकदरम्यान तापसी पन्नूच्या पतीचा अचानक राजीनामा; होता बॅडमिंटन टीमचा कोच, म्हणाला- काही गोष्टी...

Taapsee Pannu Husband Mathias Boe Resignation: लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू हिच्या नवऱ्याने कोच पदाचा राजीनामा दिला आहे. तो भारतीय संघाचा बॅडमिंटन कोच होता.

Payal Naik

Mathias Boe Resigned: सध्या सगळीकडे पॅरिस ऑलिम्पिक २०२४ ची जोरदार चर्चा सुरू आहे. या वर्षी भारतातील मनू भाकर, सरबज्योत सिंग, स्वप्नील कुसाळे यांनी नेमबाजी स्पर्धेत कांस्य पदकावर नाव कोरलं. तर आता इतर खेळांकडे भारतीयांचं लक्ष लागलं आहे. मात्र अशातच एक मोठी बातमी समोर येते आहे. ऑलिम्पिकमध्ये खेळणाऱ्या भारतीय बॅडमिंटन संघाचा कोच आणि लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू हीच पती असणाऱ्या मॅथियास बो याने राजीनामा दिला आहे. त्याने त्याचं कोच पद सोडलं आहे. त्याने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर करत याबद्दल माहिती दिली आहे.

मॅथियास हा ऑलिम्पिकमध्ये भारताकडून खेळणाऱ्या चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज रँकीरेड्डी यांचा कोच होता. गुरुवारी सात्विक आणि चिराग यांना पुरुष दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत मलेशियाच्या आरोन चिया आणि सोह वूई यिक यांच्याकडून २१-१३, १४-२१, १६-२१ असा पराभव पत्करावा लागला. त्यानंतर शनिवारी मॅथियास याने एक पोस्ट करत आपण आता रजा घेत असल्याचं जाहीर केलं. त्याने एक पोस्ट शेअर करत लिहिलं, 'माझ्यासाठी, माझे कोचिंगचे दिवस इथे येऊन संपतात, मी आता बॅडमिंटन आणि कोचिंग भारतात किंवा इतर कोठेही सुरू ठेवणार नाही, किमान आत्ता तरी. मी बॅडमिंटन हॉलमध्ये खूप वेळ घालवला आहे आणि प्रशिक्षक बनणे खूप तणावपूर्ण आहे. मी एक थकलेला म्हातारा माणूस आहे.' असं म्हणत ४४ वर्षीय मॅथियास बो याने राजीनामा जाहीर केला.

यासोबतच त्याने सात्विक आणि चिराग यांना धीर देत लिहिलं, 'मला तुमच्या भावना चांगल्याच ठाऊक आहेत. स्वतःला दररोज एका क्षमतेपर्यत पुश करणं प्रत्येकाला जमत नाही. पण काही गोष्टी आपल्या अपेक्षेप्रमाणे घडत नाहीत. मला ,माहीत आहे की तुम्ही निराश आहात, मला माहीत आहे की तुम्हाला भारताला पदक मिळवून द्यायचे होते, परंतु यावेळी कदाचित ते शक्य नव्हते. तुमच्याकडे अभिमान वाटण्यासारखे सर्व काही आहे, या ऑलिम्पिक शिबिरात तुम्ही किती कष्ट केले, दुखापतींशी झुंज दिली, वेदना कमी करण्यासाठी इंजेक्शन्स देखील घेतली. त्यामुळे निराश होऊ नका.' मॅथियास हा लंडन येथील ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदकाचा मानकरी ठरला होता. मॅथियास आणि तापसीने याच वर्षी लग्नगाठ बांधली. तापसीदेखील त्याच्यासोबत पॅरिस ऑलिम्पिक येथे गेली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: हॅरी ब्रूकने 'खांद्या'ने वाचवली स्वतःची विकेट! लढवली अक्कल, पण झाला असता त्याचाच गेम; रिषभ पंत भडकला

Ashadhi Wari 2025: वारकऱ्यांसोबत श्वानाची पंढरपूर वारी! महिनाभरात पालख्यांबरोबर चालत पोचतोय विठ्ठलचरणी

"उपाध्येंना अटेंशनची सवय.." निलेश साबळे-शरद उपाध्ये वादावर मराठी कलाकार व्यक्त ; म्हणाले...

PCMC News : आणखी तेरा ठिकाणी स्वस्त धान्य दुकाने; पुणे, पिंपरी-चिंचवड क्षेत्रांतील नागरिकांना ३१ जुलैपर्यंत करता येणार अर्ज

Hinjewadi News : हिंजवडी फेज २ ते लक्ष्मी चौक रस्ता होणार खुला; रस्त्यातील अतिक्रमणांवर ‘पीएमआरडीए’कडून कारवाई

SCROLL FOR NEXT