taapsee pannu marries boyfriend Mathias Boe in Udaipur Wedding report Latest marathi News  Esakal
Premier

Taapsee Pannu Wedding: तापसीने बॅडमिंटनपटू बॉयफ्रेंडसोबत गुपचूप उरकलं लग्न! 'या' सेलिब्रेटींनी उदयपूरमध्ये लावली हजेरी

Taapsee Pannu Wedding Latest News : बॉलीवुड अभिनेत्री तापसी पन्नू सध्या चर्चेत आली आहे.

रोहित कणसे

Taapsee Pannu Wedding Latest News : बॉलीवुड अभिनेत्री तापसी पन्नू सध्या चर्चेत आली आहे. काही दिवसांपासून दावा केला जात होता की तापसीने तिचा लाँगटाइम बॉयफ्रेंड मॅथियास बो याच्यासोबत लग्न करणार आहे. मात्र आता या दोघांनी लग्न केल्याचे सांगितलं जात आहे. तापसीने उदयपूरमध्ये वर्ल्ड चॅम्पियन राहिलेला बॅडमिंटनपटू मॅथियास बो याच्यासोबत गुपचूप लग्न उरकलं आहे. सांगितलं जातंय की या दोघांनी २३ मार्च रोजीच लग्नगाठ बांधली आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, तापसी आणि ऑलम्पिक पदक विजेता मॅथियास बो या दोघांनी २३ मार्च रोजी कुटुंबिय आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत लग्न केलं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लग्नाच्या विधी २० मार्च रोजी सुरू झाल्या होत्या. मात्र मीडिया अटेंशन टाळण्यासाठी गुपचूप लग्न सोहळा आयोजित केला होता. मात्र तापसीकडून अद्याप याबद्दल कुठलीही महिती देण्यात आलेली नाहीये.

रिपोर्ट्सनुसार तापसीने आपल्या लग्नात आपल्या अगदी जवळच्या मित्रांना निमंत्रण दिलं होतं. यामध्ये तापसीचा मित्र अनुराग कश्यप आणि कनिका ढिल्लो यांना निमंत्रीत करण्यात आला होतं. अनुराग कश्यप आणि तापसीने दोबारा मध्ये एकत्र काम केलं होतं, तसेच कनिका ढिल्लोने तापसीसोबत हसीन दिलरुबा, मनमर्झींयां, फिर आई हसीन दिलरुबा यांची स्क्रीप्ट लिहीली आहे. कनिका ने सोशल मीडियावर तापसीची बहिण शगुन सोबतचे फोटो देखील शेअर केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trumps Tariff Bomb: ट्रम्प 'टॅरिफ'मुळे भारताच्या टेक्सटाईल्स, फार्मासह 'या' ५ उद्योगांना बसणार फटका, पाहा संपूर्ण लिस्ट

Amit Shah Rajya Sabha Speech: ‘माझ्याशी तर निपटा, पंतप्रधानांना कशाला बोलावताय, आणखी त्रास होईल’’

Latest Marathi News Updates : पुणे महापालिकेचे क्षेत्रीय कार्यालये होणार सशक्त

Pune Porsche Crash Case : आईच्या शस्त्रक्रियेसाठी विशाल अग्रवालचा तात्पुरत्या जामिनाचा अर्ज न्यायालयाने फेटाळला

WCL 2025 स्पर्धेतून युवराज सिंगच्या भारतीय संघाची माघार; पाकिस्तानविरुद्ध सेमीफायनलवर बहिष्कारानंतर...

SCROLL FOR NEXT