taapsee pannu  sakal
Premier

Taapsee Pannu: सेल्फीसाठी आलेल्या चाहतीला तापसी पन्नूचा नकार; व्हिडिओ व्हायरल होताच चाहतीने विचारला जाब

Taapsee Pannu Troll: लोकप्रिय अभिनेत्री तापसी पन्नू हिचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यात ती एका मुलीला सेल्फीसाठी नकार देताना दिसतेय.

Payal Naik

लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू हिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं. तिने अनेक हिट चित्रपट दिले आहेत. तिच्या अभिनयाचं कायमच कौतुक होताना दिसतं. मात्र तिच्या वागण्यावर चाहते नेहमी ताशेरे ओढताना दिसतात. तापसी अनेकदा चाहत्यांसोबत आणि पापाराझींसोबतही वाईट वागताना दिसते. तिचे पापाराझींवर ओरडतानाचे व्हिडिओही व्हायरल होत असतात. अशातच आता तिचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यात ती एका मुलीला सेल्फीसाठी नकार देताना दिसतेय. मात्र हा व्हिडिओ वायरल होताच त्या मुलीने कमेंट करत तिथे नेमकं काय घडलं हा सांगत तापसीच्या वागण्यावर राग व्यक्त केला आहे.

तापसीचा 'फिर आयी हसीन दिलरुबा' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यापूर्वी एका कार्यक्रमातील अभिनेत्रीचा व्हिडिओ व्हायरल होतोय. यात एक मुलगी तापसीसोबत स्टेजवर दिसतेय. ती तापसीसोबत हात मिळवणीदेखील करते मात्र जेव्हा ती तापसीकडे सेल्फीची मागणी करते तेव्हा तापसी तिला नम्रपणे नकार देते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर येताच त्या मुलीने तापसीच्या वागण्यावर ताशेरे ओढत तिला प्रश्न विचारले आहेत. तिच्या प्रतिक्रियेवरून ती मुलगी इन्फ्लुएन्सर असल्याचं समजतं.

तिने व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना लिहिलं, 'ती मी आहे. मला समजत नाही की जेव्हा तुम्ही चारी बाजूने कॅमेरांनी वेढलेले असता तेव्हा तुम्ही सेल्फीसाठी का नकार देता? आमच्यासारख्या इन्फ्लुएन्सरना बोलावण्याचं मुख्य कारण हे तिच्या चित्रपटाचं गाणं प्रमोट करणं होतं. तिला एका चांगल्या पीआरची गरज आहे. ' त्यावर एका युझरने तिला तापसी तिच्यासोबत काय बोलली हे विचारल्यावर तिने लिहिलं, 'तापसी म्हणाली की स्टेजवर सेल्फी घेऊ नको. इथे सगळेच आहेत.'

taapsee pannu

तर या व्हिडिओमध्ये त्यांच्या पाठीमागे काहीतरी कार्यक्रम सुरू असल्याचं दिसतंय. यावर अनेकांनी तापसीला दोष देत तिला ट्रोल केलं आहे. तुम्ही तिच्याकडे सेल्फीसाठी गेलातच का असा प्रश्नही अनेकांनी विचारला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs RR Live: इशान किशन बरसला, हेनरिच क्लासनही जबरदस्त खेळला; पण, राजस्थानच्या गोलंदाजांचे पुनरागमन, नितीश रेड्डी भिडला

MPSC पदसंख्या वाढ, मेडिकल कौन्सिल नियमांमध्ये बदल अन्...; मंत्रिमंडळ बैठकीत महायुती सरकारचे ८ महत्त्वाचे निर्णय

MPSC Success Story: पहुरजिऱ्याचा अजय दिघडेचा पराक्रम; MPSC उत्तीर्ण होऊन असिस्टंट कमिशनर पदावर झेप, आई-वडिलांच्या कष्टांना यशाची किनार..

SRH vs RR Live: इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले! पण, जिंकली Orange Cap; झेल घेताना दोन खेळाडू एकमेकांना आपटले

Gadchiroli Health: कोरची तालुक्यात गरोदर मातेसह बाळाचा मृत्यू; आशा वर्करची टाळाटाळी, रुग्णालयात ऑक्सिजनची कमतरता अन्..

SCROLL FOR NEXT