zakir hussain, padma vibhushan zakir hussain,  SAKAL
Premier

Zakir Hussain: पद्मविभुषण झाकीर हुसेन कायमच राहिले बॉलीवूडपासून चार हात लांब.. कारण..

Zakir Hussain Death news: प्रसिद्ध तबलावादक आणि संगीतकार झाकीर हुसेन यांचे रविवारी, १५ डिसेंबर २०२४ रोजी वयाच्या ७३ व्या वर्षी निधन झाले आहे.

Devendra Jadhav

Padma Vibhushan Zakir Hussain:

प्रसिद्ध तबलावादक आणि संगीतकार झाकीर हुसेन यांचे रविवारी, १५ डिसेंबर २०२४ रोजी वयाच्या ७३ व्या वर्षी निधन झाले आहे. याआधी रविवारी हुसैन यांना हृदयाशी संबंधित समस्यांमुळे सॅन फ्रान्सिस्कोच्या हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते.

या वर्षी केंद्र सरकारने प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कार जाहीर केले होते. यामध्ये महाराष्ट्रातील 12 जणांना विविध पुरस्कार जाहीर झाला होता, यामध्ये प्रसिद्ध तबलावादक झाकिर हुसेन यांना कला क्षेत्रातून पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला होता.

(Tabla Maestro Ustad padma vibhushan Zakir Hussain never work in bollywood this is the reason)

झाकीर हुसेन यांनी त्यांच्या तबलावादनाने गेली अनेक पिढ्या प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. झाकीर हुसेन सुप्रसिद्ध तबलावादक असूनही ते बॉलिवूड पासून मात्र चार हात लांबच राहीले. एका मुलाखतीत झाकीर हुसेन यांनी यामागचे कारण सांगितलं होतं.. "लाईव्ह मैफिलीत लोकांसमोर परफॉर्म करणे हे माझे पहिले प्रेम आहे. जर मी सिनेमांसाठी संगीत देत असेल, तर मला एकाच ठिकाणी उभे राहणे आवश्यक आहे.

माझ्यासारख्या जगभर फिरणाऱ्या व्यक्तीसाठी एकाच ठिकाणी उभं राहणं अत्यंत कठीण आहे. मी बॉलिवूडला कधीच नाही म्हटले नाही. पण जर मला प्रॉडक्शन हाऊससोबत काम करण्याची संधी मिळाली आणि त्याचा माझ्या मैफिलीच्या वेळापत्रकावर परिणाम होत नसेल, तर मी जरूर काम करेल"

अशाप्रकारे लाईव्ह मैफिलीत होणाऱ्या परफॉर्मन्सला झाकीर हुसेन प्राधान्य देतात. बॉलिवूड मध्ये स्टुडिओ मध्ये काम करणं एक कलाकार म्हणून झाकीर हुसेन यांना काहीस आवडले नाही. लाईव्ह मैफिलीत लोकांसमोर सादरीकरण करण्यात झाकीर हुसेन यांचं मन रमायचं. त्यामुळे निर्माता - दिग्दर्शक जे सांगेल त्या आधारे संगीत निर्माण करण्यास झाकीर हुसेन याना तितकं पटलं नाही.

झाकीर हुसेन यांना त्यांचे वडिल उस्ताद अल्ला राखा यांच्याकडून तबलावादनाचे धडे मिळाले. वयाच्या ७ व्या वर्षापासूनच झाकीर हुसेन मैफिलीत तबलावादन करू लागले. केंद्र सरकारने पद्मविभूषण पुरस्कार देऊन झाकीर हुसेन यांच्या कार्याचा उचित सन्मान केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dabholkar Murder Case : नरेंद्र दाभोलकर हत्याकांडात मोठी अपडेट ! शरद कळसकरला हायकोर्टाकडून जामीन मंजूर

1250 Range EV : एका चार्जवर मुंबई ते दिल्ली! 'या' कारने मार्केटमध्ये उडवली खळबळ; ९५५ हॉर्सपॉवरसह १२५० किमी रेंज, किंमत...

Latest Marathi News Live Update: बंगाल निवडणुकीत भाजपला मदत करण्यासाठी केंद्रीय दले कार्यरत: मतदान केल्यानंतर ममता यांचे विधान

Jamgaon News: डीजेच्या आवाजाने घाबरून पळालेल्या 27 बकऱ्या मॉर्निंग वॉककरांनी शोधून मालकाकडे सुपूर्द

Nitur Farmers:अनियमित वीजपुरवठ्यामुळे मांजरा नदीकाठची बागायती शेती धोक्यात

SCROLL FOR NEXT