tabu  sakal
Premier

Tabu: अन् दिग्दर्शकाने तेलाची बाटलीच डोक्यावर ओतली... २७ वर्षांनंतर तब्बूने सांगितली विरासत चित्रपटाची आठवण

Tabu Recall Virasat Movie: लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री तब्बू हिने २७ वर्षानंतर 'विरासत' चित्रपटाची आठवण सांगितली आहे.

Payal Naik

Tabbu Upcoming Movie: २७ वर्षांपूर्वी लोकप्रिय दाक्षिणात्य दिग्दर्शक प्रियदर्शन यांचा एक बॉलिवूड चित्रपट खूप गाजला होता तो म्हणजे 'विरासत'. या चित्रपटात अभिनेता अनिल कपूर, अभिनेत्री तब्बू , पूजा बत्रा आणि मिलिंद गुणाजी यांच्या मुख्य भूमिका होत्या. आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तब्बूने या चित्रपटातील एक मजेशीर किस्सा सांगितला आहे. जेव्हा दिग्दर्शकाने तिच्या हेअरस्टाइलसाठी सगळी तेलाची बाटली रिकामी केली होती. असं नेमकं काय घडलं होतं?

प्रियदर्शन यांच्या 'विरासत' या चित्रपटाने प्रेक्षकांचं भरभरून कौतुक मिळवलं होतं. १९९७ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात तब्बूने गहना ठाकूर ही भूमिका साकारली होती. ही भूमिका तिच्या करिअरच्या उत्कृष्ट भूमिकांपैकी एक ठरली. आता झूमला दिलेल्या मुलाखतीत तिने या चित्रपटाच्या काही आठवणी सांगितल्या आहेत. तब्बू म्हणाली, 'या भूमिकेसाठी मला गावाकडची एक मुलगी दिसायचं होतं. प्रियदर्शन यांना वाटत होतं की माझे केस तेलात बुडलेले दिसायला हवेत आणि मी एक गावाकडची मुलगी दिसेन. माझ्या हेअर स्टायलिस्टने मला जेल लावायला सांगितलं.'

पुढे तब्बू म्हणाली, 'जेव्हा मी सेटवर गेले तेव्हा प्रियदर्शन यांनी विचारलं, तू तेल लावलंय? मी म्हणले हा थोडंसं. चांगलं चमकतंय. ते काहीच बोलले नाहीत आणि मागून एक नारळाच्या तेलाची बाटली घेऊन परत आले. पूर्ण तेल त्यांनी माझ्या डोळ्यावर ओतलं. त्यानंतर म्हणाले, 'मी केसांना तेल लावायला सांगितलं म्हणजे असं सांगितलं. पण त्यानंतर माझ्यासाठी सगळं आणखी सोपं झालं. मला हेअरस्टाइल करावी लागत नव्हती. मी पाच मिनिटात तयार होत होते. लांब केस, तेल लावायचं, वेण्या बांधायच्या आणि सेटवर जायचं.

तब्बूने 'कालापानी', 'हेराफेरी', 'स्नेगिथिये' या चित्रपटांमध्येही प्रियदर्शन यांच्यासोबत काम केलं. आता तब्बू अजय देवगन आणि जिमी शेरगील यांच्यासोबत 'औरो मे कहा दम था' या चित्रपटात दिसणार आहे.

Political Astrology : फडणवीसांसाठी कटकटीचा काळ ते राज्याच्या राजकारणात मोठ्या फेरबदलाची शक्यता...जाणून घ्या या आठवड्याचं राजकीय भविष्य!

मुलाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी नातवाला संपवलं, आजोबा बंडू आंदेकरसह ११ जणांवर गुन्हा दाखल

Ganpati Visarjan 2025 Live Updates : समुद्राला भरती आल्याने लालबागच्या राजाचं विसर्जन रखडलं

Video: अक्षय कुमार आणि अमृता फडणवीस गणेशोत्सवानंतर स्वच्छता मोहिमेत सहभागी, समुद्रकिनाऱ्याची केली साफसफाई

लालबागच्या राजाचं विसर्जन कसं करायचं? गुजरातहून खास अत्याधुनिक तराफा आणला, पण मूर्ती चढवण्यात अडचणी

SCROLL FOR NEXT