Premier

Varalaxmi Wedding: लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेत्रीने पंतप्रधान मोदींना दिलं लग्नाचं आमंत्रण; शेअर केले खास फोटो

Varalaxmi Sarathkumar: लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेत्री वरलक्ष्मी हिने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लग्नाचं आमंत्रण दिलं आहे.

Payal Naik

Varalaxmi Sarathkumar Wedding:लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेत्री वरलक्ष्मी सरथकुमार ही प्रेक्षकांची अत्यंत लाडकी आहे. ती सोशल मीडियावरही सक्रीय असते. वरलक्ष्मीने नुकतेच शेअर केलेले काही फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत. त्याचं कारण म्हणजे वरलक्ष्मीने घेतलेली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट. वरलक्ष्मी लवकरच बोहोल्यावर चढणार आहे. त्यामुळे आपल्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी तिने पंतप्रधानांची भेट घेतली. तिने आपल्या लग्नासाठी त्यांना आमंत्रित केलं आहे.

मार्च महिन्यात वरलक्ष्मीचा निकोलाई सचदेव याच्यासोबत साखरपुडा पार पडला होता. आता ती लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. आपल्या लग्नाचं आमंत्रण देण्यासाठी तिने सहकुटुंब मोदींची भेट घेतली. या फोटोंमध्ये तिच्या होणाऱ्या पतीसोबतच तिचे वडील राजकारणी आणि अभिनेते असलेले आर सरथकुमार दिसत आहेत. सोबतच अभिनेत्री राधिका सरथकुमारदेखील आहेत. तिने एक व्हिडिओ शेअर करत चाहत्यांसोबत आपला आनंद व्यक्त केला आहे. हा व्हिडिओ शेअर करत तिने लिहिलं, 'एका दिवसात दिल्ली, माननीय पंतप्रधानांना भेटणं हे किती मोठं सौभाग्य होतं.'

तिने पुढे लिहिलं, 'खूप व्यग्र असूनही त्यांनी आमच्यासाठी वेळ दिला. त्यांना आमच्या लग्नासाठी आमंत्रित करण्याचा मान मिळाला. इतकं प्रेमळ स्वागत केलं त्याबद्दल धन्यवाद. आम्ही अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनाही भेटलो. त्यांच्याशी गप्पामारून खूप छान वाटलं. एकंदरीतच खूप भारी अनुभव होता.' वरलक्ष्मीने शेअर केलेले फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Indians Playoff Scenario: ८ सामने, ६ पराभव! मुंबई इंडियन्स प्ले ऑफमध्ये कसे पोहोचणार? हैदराबादने केले चारीमुंड्या चीत

MI vs SRH Live: मुंबई इंडियन्सकडून भली मोठी चूक; अंबानी झाले 'शॉक'! ट्रॅव्हिस हेडने त्यानंतर जे केलं, ते पाहून अख्खं स्टेडियम शांत

Property Tax : मिळकतकर चुकविणारे रडारवर; ५०० मालमत्तांवर जप्तीची टांगती तलवार; १० मेपासून धडक मोहीम

Shirur Traffic Drive: काळ्या काचा व फॅन्सी नंबरप्लेटला शिरूर पोलिसांचा चाप; दिवसभरात २९ वाहनांवर दंडात्मक कारवाई

Mumbai: पावसाळापूर्व नालेस्वच्छता ३१ मे पर्यंत पूर्ण करा, अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांचे निर्देश

SCROLL FOR NEXT