yek number  esakal
Premier

Yek Number Movie Review: राज ठाकरेंवर सिनेमा मग चर्चा तर होणारच! कसा आहे तेजस्विनीचा 'येक नंबर'?

Tejaswini Pandit Yek Mumber Movie Review: तेजस्विनी पंडित हिची निर्मिती असलेला 'येक नंबर' हा चित्रपट १० ऑक्टोबर रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. वाचा कसा आहे चित्रपट?

Payal Naik

शब्दांकन - संदेश वाहाणे

मनसे प्रमुख राज ठाकरे आणि त्यांच्या अवती भोवती गुंफण्यात आलेली कथा म्हणजे 'येक नंबर'. तर ही कथा आहे प्रतापची ज्याचं गावातल्या पिंकीवर खूप प्रेम आहे आणि प्रेमापोटी तिने दिलेला टास्क तो पूर्ण करायला मुंबईत येतो आणि आल्यावर त्याला काय काय अडचणींचा सामना करावा लागतो, ठाकरेसाहेब त्याच्या गावात येतात का की एक वेगळंच नाट्य सुरू होतं हे सर्व आपल्याला यात बघायला मिळतं. कलाकारांच्या अभिनयाबद्दल सांगायचं तर धैर्य घोलप हा सिनेमाचा हिरो आहे ज्याने याआधी 'अथांग' नावाची वेब सीरिज केली होती आणि 'येक नंबर' त्याचा मुख्य अभिनेता म्हणून पहिलाच चित्रपट आहे. हा ही गोष्ट वेगळी आहे की त्याचं काम 'येक नंबर' वाटत नाही.

२- ३ एक्स्प्रेशनवर त्याने पूर्ण सिनेमा ओढून नेलाय. जसे इतर सीन असतात तेच हावभाव आणि डायलॉग. पण त्याच्या वाट्याला जे आलंय ते तो प्रामाणिकपणे करतोय असं जाणवतं. त्याने त्याच्या भूमिकेला न्याय देण्याचा पूर्ण प्रयत्न केलाय. सायली पाटीलचा स्क्रीन टाइम खूप कमी होता पण तिने तेवढ्या वेळातही प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडलीये. सायली एखादा फिमेल लीड चित्रपट नक्कीच चांगला करू शकते. बाकी पुष्कर श्रोत्री, आनदं इंगळे, संजय मोने आणि निलेश दिवेकर यांनी त्यांच्या भूमिका चोखपणे पार पाडल्यात.

व्हिलन भाव खाऊन गेला

यासगळ्यात राजेश खेरा ज्याने खलनायक साकारला आहे तो मात्र भाव खाऊन जातो. त्याचा अभिनयातील अनुभव इथेही दमदार पद्धतीने दिसतो. याव्यतिरिक्त तेजस्विनी पंडितचा छोटासा रोल आहे जी स्टोरीला पुढे नेण्याचं काम करते. दिग्दर्शनाबद्दल बोलायचं झालं तर राजेश मापसुकर यांचं काम कौतुकास्पद आहे. प्रेक्षकांना कथेत गुंतवून ठेवण्याचं काम त्यांनी योग्य पद्धतीने केलं आहे. नवीन जुन्या सर्व कलाकारांकडून त्यांनी चांगलं काम काढून घेतलयं आणि कथेला न्याय देण्याचा प्रयत्न केलाय. अरविंद जगताप आणि मयरुेश जोशी यांचं रायटिंग दाद देण्यासारखं आहे. कथा कुठेही सैल न पडू देता ते त्यात जीव ओतायचं काम करतात.

चित्रपटातील संवाददेखील उत्तम आहेत. तसेच विचार करायला भाग पाडणारे आहेत. इंटरव्हल आधीच चित्रपट कॅरेक्टर बिल्डअपमध्ये अडकलाय. आणि ट्रेलरमध्ये दाखवण्यात आपल्याप्रमाणे आपल्याला वाटत राहतं की प्रताप पिंकीला दिलेलं वचन पूर्ण करणार. पण कथा जास्त वेळ न घालवता आपला रूट चेंज करते तसा याचा पहिला भाग थोडासा रटाळ आणि प्रेडिक्टेबल वाटतो पण दुसऱ्या भागात चित्रपट ग्रीप पकडतो आणि आपल्याला कथेशी बांधनू ठेवतो. जेव्हा परिस्थिती वाईट होत जाते तेव्हा काही ट्विस्टपण बघायला मिळतात जे कल्पनेच्या पलीकडचे आहेत. त्यामुळे सिनेमा चांगला झाला आहे.

यातलं 'येक नंबर' हे गाणं सिद्धार्थ जाधवच्या एन्ट्री पर्यंत ऐकण्यासारखं आहे आणि तो आल्यानंतर बघण्यासारखं. त्यात सौरभचा रॅप गाण्याला अजनू वरच्या लेवलला घेऊन जातो. 'जाहीर झालं' हे गाणं मध्येच आलं असं वाटतं. ते जर सिनेमा संपल्यानंतर दाखवलं असतं तरी चाललं असतं. बाकी अजय अतुल यांचं म्युझिक आणि साई पियुष यांचं बॅकग्राऊंड म्युझिक खूप मस्त आहे. महत्वाचं म्हणजे संजय मेमाणे यांची सिनेमॅटोग्राफी आपल्याला फील होते. त्यांची ती मेहनत पडद्यावर दिसते.

यात हिंदू मुस्लिम विषयावरही भाष्य केल गेलंय. तर जो व्हिलन आहे त्याची थोडीफार कथा दाखवायला हवी होती. तो जे वागतोय तो का याचं कारण समजायला मदत झाली असती. आता साहेबांचा सिनेमा म्हटल्यावर त्यांची चर्चा तर असणारच. त्यांचे विचार आणि कामावर अधनू मधनू फोकस केला जातो. जे निगेटिव्ह पॉईंट तर म्हणता येणार नाहीत. तसे आपण अशा प्रकारच्या कथेवर आधारित बरेच सिनेमे पाहिले त्यामुळे या चित्रपटात वेगळं असं काही वाटत नाही आणि हा एक टिपिकल मुव्ही बनून राहतो. पण जर तुम्ही राज ठाकरे यांच्या विचारांचे समर्थक असाल तर हा सिनेमा तुम्हाला खूप आवडेल. आणि इतरांनीही केवळ मनोरंजन म्हणून पाहायला जाण्यासारखा तर हा सिनेमा नक्कीच आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fetus Gender Testing Center: गर्भलिंग चाचणी केंद्र कळवा अन् एक लाख रुपये मिळवा! काय आहे 'ही' योजना जाणून घ्या

Pune: अर्धवट कपडे अन् हातात विळा, बसमध्ये चढून व्यक्तीचा तरुणावर हल्ला अन्...; व्हायरल व्हिडिओनं बारामती हादरलं

Mumbai News: धारावी पुनर्वसनावरून नागरिकांचा रोष, मुलुंडमध्ये स्थलांतर विरोधात उपोषण; मविआचा पाठिंबा

Malegaon Bomb Blast : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात पंतप्रधान मोदींना अडकवण्याचा होता कट; साध्वी प्रज्ञासिंह यांचा खळबळजनक दावा

Latest Maharashtra News Updates Live: पतीने केला पत्नीचा खून

SCROLL FOR NEXT