Salman And Rajinikanth Eskal
Premier

Salman & Rajinikanth: सलमान-अॅटलीच्या सिनेमात रजनीकांतही दिसणार ? महत्त्वाची अपडेट समोर

Salman And Rajinikanth are working together : अभिनेता सलमान खान आणि सुपरस्टार रजनीकांत दिग्दर्शक अटलीच्या आगामी सिनेमात एकत्र काम करणार असल्याची चर्चा आहे.

सकाळ डिजिटल टीम

Salman New Movie : जवान या गाजलेल्या सिनेमाचा दिग्दर्शक अॅटलीने (Atlee) या सिनेमाच्या यशामुळे सध्या बॉलिवूडमध्ये चर्चेत आहे. या सिनेमामुळे अॅटलीला (Atlee) बॉलिवूडच्या सुपरस्टारबरोबर काम करण्याची संधी मिळाली आहे. अॅटली (Atlee) बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान (Salman Khan) बरोबर काम करणार असल्याची चर्चा होती पण नुकत्याच हाती आलेल्या वृत्तानुसार, अटलीच्या या आगामी सिनेमात साऊथ सुपरस्टार रजनीकांतही (Rajinikanth) काम करणार आहेत.

काही दिवसांपूर्वीच पिंकव्हिलाने दिलेल्या वृत्तानुसार, सलमान (Salman Khan) आणि अॅटली (Atlee) एका प्रोजेक्टसाठी एकत्र काम करत असल्याचं त्यात म्हंटलं होतं आणि या प्रोजेक्टसाठी दक्षिणेतील एका मोठ्या अभिनेत्याला कास्ट करणार असल्याची चर्चा होती.

पण नुकत्याच हाती लागलेल्या बातमीनुसार, या प्रोजेक्टसाठी अटलीची टीम रजनीकांत यांच्याशी चर्चा करत आहेत. जर ही चर्चा यशस्वी झाली तर हा भारतातील सगळ्यात मोठा बिग बजेट मल्टीस्टारर सिनेमा ठरेल अशी चर्चा आहे. सध्या रजनीकांत वेत्तियन आणि कुली या त्यांच्या आगामी प्रोजेक्टसाठी व्यस्त आहेत. त्यामुळे या सिनेमांनंतरच ते या सिनेमासाठी काम करतील अशी चर्चा आहे.

दरम्यान सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सलमान (Salman Khan) आणि अॅ टली (Atlee) गेले वर्षभर एकमेकांशी संपर्कात असून आणि त्यांनी अनेक कथांवर चर्चा केलीये ज्यावर ते सिनेमा तयार करू शकतील. त्यांची चर्चा चांगल्या दिशेने पुढे जात असून सलमान आणि अॅ टली यांच्या विचारांशी सिनेमाचा विषय असेल अशा विषयाचा ते शोध घेत आहेत. तूर्तास, सलमानने या प्रोजेक्टला होकार दिला असून सध्या सिनेमाचं कथानक आणि पटकथेवर त्यांची टीम काम करत आहे.

या सिनेमासाठी साऊथ आणि बॉलिवूड इंडस्ट्रीमधील आघाडीचे कलाकार घेण्याचा अटलीचा विचार आहे. पण हे कलाकार कोण असणार हे अजून निश्चित नाहीये. सध्या फक्त रजनीकांत यांचं नाव समोर आलं असून इतर कोण कलाकार या सिनेमात असणार हे जाणून घेण्यासाठी चाहत्यांना धीर धरावा लागणार आहे.

सलमानचा पुढच्या वर्षी सिकंदर हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून या सिनेमात त्याच्याबरोबर रश्मिका मंदाना काम करणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! आठव्या वेतन आयोगानुसार किमान 'इतका' असेल पगार, आकडा आला समोर

IND vs NZ 3rd T20I : भारताने जिंकली सलग नववी ट्वेंटी-२० मालिका! अभिषेक, सूर्यकुमारच्या वादळासमोर न्यूझीलंडचा पालापाचोळा

Latest Marathi news Update : देश-विदेशातील दिवसभरातील घडामोडी जाणून घ्या एका क्लिकवर...

IND vs NZ 3rd T20I : 4,4,4,4,4,6,6,6,6 ! अभिषेक शर्माचे १४ चेंडूंत अर्धशतक; मोडला हार्दिक पांड्याचा विक्रम...

Beyond Bandish : 'बियॉंड बंदिश' कार्यक्रमात विराज जोशी यांचे 'ऑरा फार्मिंग', पहिल्याच एकल सादरीकरणात रसिकांवर गारूड

SCROLL FOR NEXT