thangalaan movie trailer  sakal
Premier

Thangalaan Trailer: ज्याला मरणाची भीती नाही तोच जिवंत राहील! 'थंगलान' चित्रपटाच्या ट्रेलरचा धुमाकूळ, पाहून अंगावर येईल काटा

Thangalaan Movie Trailer Release: लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेता चियान विक्रम याच्या 'थंगलान'चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे.

Payal Naik

Thangalaan Movie Release Date: यापूर्वी अनेक दमदार दाक्षिणात्य चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. 'केजीएफ', 'पुष्पा' यांसारख्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर कमाईचे रेकॉर्ड तोडले आहेत. अशातच आता या चित्रपटांना टक्कर द्यायला आणखी एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. दाक्षिणात्य अभिनेता चियान विक्रम याच्या 'थंगलान' या बहुप्रतीक्षित चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. प्रेक्षक या ट्रेलरची आतुरतेने वाट पाहत होते. अखेर हा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे आणि व्हिडिओ पाहून चाहते ट्रेलरचं कौतुक करताना थकत नाहीयेत.

या ट्रेलरमध्ये असं काहीतरी पाहायला मिळतंय जे यापूर्वी कधीही पाहिलं नाही. स्वतःच्या हक्कासाठीच्या लढयात प्राणांची पर्वा न करणारे योद्धे आपल्याला पाहायला मिळतायत. ट्रेलरमध्ये अभिनेत्याचा दमदार लूक पाहायला मिळतोय. चाहते आता त्याच्या अभिनयाचं कौतुक करत आहेत. हा ट्रेलर तुम्हाला एका वेगळ्या जगात घेऊन जातो जिथे तुम्हाला कोलार गोल्ड फिल्डचा म्हणजेच केजीएफचा इतिहास पाहायला मिळतोय. २०० वर्षांपूर्वीही इंग्रजांनी केजीएफला शोधून तिथल्या सोन्याची कशी लूट केली आणि तिथल्या लोकांना कशी वागणूक दिली हे या ट्रेलरमधून पाहायला मिळतंय.

तर या ट्रेलरमधील अनेक गोष्टी संभ्रमात टाकणाऱ्या आहेत. विचार करायला लावणाऱ्या आहेत. आता ट्रेलर पाहिल्यावर हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. नेटकरी या व्हिडिओवर प्रतिक्रिया देत आहेत. असा ट्रेलर यापूर्वी कधीही पाहिला नाही, चियानचा अभिनय जबरदस्त, अशा प्रतिक्रिया आता नेटकरी देत आहेत. 'थंगालन' आजपासून 36 दिवसांनी म्हणजे 15 ऑगस्ट 2024 रोजी हिंदी, तमिळ, तेलगू, कन्नड आणि मल्याळममध्ये जगभरात रिलीज होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

न्यायाधीश व्हायचं होतं, पण लग्नासाठी घरच्यांचा दबाव; वकील तरुणीनं बेपत्ता होण्याचा आखला प्लॅन, १३ दिवसांनी सापडली

Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेचा मोठा निर्णय! युवा नेतृत्वासाठी मोकळी केली वाट; म्हणाला, हीच योग्य वेळ...

ठरलं तर मग! या दिवशी सुरु होणार ‘स्टार प्रवाह’वर दोन नवीन मालिका, वेळही ठरली! तर हे कलाकार घेणार प्रेक्षकांचा निरोप

Everest Base Camp: 'सातारच्या ६३ वर्षीय गिर्यारोहकाने सर केला एव्हरेस्ट बेस कॅम्प';खडतर चढाई करत हिमालयाच्या शिखरावर फडकवला मराठी झेंडा

Maharashtra Latest News Update: बाळासाहेब थोरात यांच्या समर्थनार्थ निघालेल्या मोर्चाला प्रचंड गर्दी...

SCROLL FOR NEXT