jui gadakari post  sakal
Premier

काही लोकांना मी आवडत नाही तरी... लोकप्रियतेच्या शिखरावर असताना जुई गडकरीची गूढ पोस्ट; नेमकं झालंय काय?

Jui Gadkari Viral Post: लोकप्रिय मराठी अभिनेत्री जुई गडकरी हिने एक पोस्ट शेअर केली आहे ज्यामुळे ती सध्या चाहत्यांमध्ये चर्चेत आहे.

सकाळ डिजिटल टीम

Tharla Tar Mag: 'ठरलं तर मग' या मालिकेतून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणारी लोकप्रिय अभिनेत्री जुई गडकरी हिने आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांना आपलंसं केलं. ती 'पुढचं पाऊल' या मालिकेतून घराघरात पोहोचली. आता ती सायली बनून प्रेक्षकांची मनं जिंकते आहे. ही मालिका गेली वर्षभर टीआरपी यादीत पहिल्या स्थानावर आहे. या मालिकेतील सायली आणि अर्जुनची जोडी प्रेक्षकांची लाडकी आहे. मात्र आता जुईने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. तिने केलेली एक पोस्ट चाहत्यांमध्ये चर्चेत आहे. तिने केलेल्या पोस्टमुळे चाहते बुचकळ्यात पडले आहेत.

जुई सोशल मीडियावर कायम सक्रीय असते. ती नेहमीच चाहत्यांसोबत जोडलेली असते. मात्र अशातच तिने शेअर केलेली स्टोरी चाहत्यांच्या चर्चेचा विषय ठरली आहे. जुईने स्टोरी शेअर करत लिहिलं, 'मी माझ्या आयुष्याच्या अशा टप्प्यावर येऊन पोहोचले आहे की, काही लोकांना मी आवडत नाही तरीही याबद्दल मी ठीक आहे. लोकांना त्यांच्या कथेतील माझा भाग सजून घेता येत नाहीये, याबद्दलही मी ठीक आहे. मी कोणालाही स्पष्टीकरण देण्यास बांधिल नाही. मी इथे माझे आयुष्य जगण्यासाठी आहे.'

jui gadakari post

जुईने पुढे लिहिलं, 'लोक काय म्हणतीलच्या बेड्यांनी मला स्वत:ला जखडून घ्यायचे नाही, हेच मी निवडले आहे. मी शांती निवडली आहे. मी माझे सत्य निवडले आहे. मी स्वत:ला निवडले आहे'. जुईने ही स्टोरी नेमकी कुणासाठी शेअर केली आहे हे मात्र तिने सांगितलं नाहीये. यासोबतच तिने ईमोजी पोस्ट करत ओके धन्यवाद असंही लिहिलं आहे. जुईने या पोस्टमधून एका प्रकारे समोरच्याला उत्तरच दिलं आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. जुईने गेल्या २ वर्षात एका मोठ्या आजाराचा सामना केला आहे. त्यानंतर तिने पुन्हा गगनभरारी घेत पुन्हा एकदा स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Booking Updates: ग्राहकांसाठी मोठा दिलासा! जुनी सुविधा पुन्हा सुरू... आता बुकिंग कसं बदललं ते जाणून घ्या

Thane Hospital: हेलीपॅड, एअर अ‍ॅम्ब्युलन्स, ९०० बेड अन्...; ठाण्यातील नवे हॉस्पिटल गेमचेंजर ठरणार, कोणत्या सुविधा मिळणार?

Andaman Sea tragedy : अंदमान समुद्रात भीषण दुर्घटना; २५० हून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती, मानव तस्करीचा उलगडा

Abhishek Sharma Axar Patel Dope Test : अभिषेक शर्मा, अक्षर पटेल 'नाडा' च्या रडारवर; आता कुठे जाता हे सांगावं लागेल... नाहीतर...

Gen Z Fashion Trends 2026: आउटडेटेड झालेल्या वायर इअरफोनच्या प्रेमात Gen Z, फॅशनमध्ये का परतला रेट्रो टच?

SCROLL FOR NEXT