The Goat Life
The Goat Life esakal
Premier

The Goat Life: सुपरस्टार पृथ्वीराजचा 'द गोट लाइफ' पाहून भारावले प्रेक्षक; "सिनेमॅटिक मास्टरपीस" म्हणत नेटकऱ्यांनी केलं कौतुक

priyanka kulkarni

The Goat Life Twitter Review: दाक्षिणत्य सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता पृथ्वीराज सुकुमारनचा (Prithviraj Sukumaran) द गोट लाइफ (The Goat Life) हा चित्रपट आज (28 मार्च) थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. या चित्रपटातील पृथ्वीराजच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक करत आहेत. आता काही नेटकऱ्यांनी या चित्रपटाचा रिव्ह्यू सोशल मीडियावर शेअर केला आहे. द गोट लाइफ हा चित्रपट पाहिल्यानंतर नेटकरी काय म्हणाले? जाणून घ्या...

'द गोट लाइफ'चं नेटकऱ्यांनी केलं कौतुक

एका नेटकऱ्यानं ट्विटरवर ट्वीट शेअर करुन द गोट लाइफ या चित्रपटाचं कौतुक केलं आहे. त्यानं ट्वीटमध्ये लिहिलं, "द गोट लाइफ हा एक सिनेमॅटिक मास्टरपीस आहे. हा एक हृदय पिळवटून टाकणारा चित्रपट जादुई जगण्याची थ्रिलर कथा दाखवतो. पृथ्वीराजनं त्याच्या करिअरमधील सर्वात चांगला परफॉर्मन्स दिला आहे. चित्रपटात ए.आर.रहमानचे मंत्रमुग्ध करणारे संगीत आहे. हा एक चित्रपट नक्की बघा."

एका नेटकऱ्यानं ट्वीटमध्ये लिहिलं, "चित्रपटाचा पहिला भाग खूप छान आहे. पृथ्वीराजनं खूप चांगलं काम केलं आहे. ए.आर.रहमानचे BGM खूपच चांगले आहे."

"परिपूर्ण सिनेमॅटिक मास्टरपीस, पृथ्वीराजचा आणखी एक हिट चित्रपट", असंही एका नेटकऱ्यानं ट्वीटमध्ये लिहिलं.

द गोट लाइफ या चित्रपटाचे दिग्दर्शन ब्लेसी यांनी केलं आहे. या चित्रपटात पृथ्वीराज सुकुमारन व्यतिरिक्त अमला पॉलनं देखील काम केलं आहे. या चित्रपटाला ए.आर.रहमान यांनी संगीत दिलं आहे.

गेल्या वर्षी पृथ्वीराज सुकुमारनचा सालार हा चित्रपट रिलीज झाला होता. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. या चित्रपटामध्ये प्रभासनं देखील प्रमुख भूमिका साकारली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Crash: निवडणुकीतील अनिश्चिततेमुळे निर्देशांकांची दीड टक्का घसरगुंडी; सेन्सेक्स १०६२ अंश घसरला

Blog : दाभोलकरांनंतर... युएन ते युगांडाकडून दखल, दोन कायदे अन् शाखांचा विस्तार

PBKS vs RCB Live Score : पंजाब किंग्जचंही चोख प्रत्युत्तर; रूसोची आक्रमक खेळी

Air India Express च्या केबिन क्रूचा संप संपला, 25 कर्मचाऱ्यांची बडतर्फी मागे घेणार

Virat Kohli PBKS vs RCB : पंजाब विराटवर फारच मेहरबान! पाच षटकात सोडले तीन कॅच; पाहा Video

SCROLL FOR NEXT