The Great Indian Kapil Show  esakal
Premier

The Great Indian Kapil Show: 'द ग्रेट इंडियन कपिल शो'च्या मंचावर विनोदाचे चौकार अन् षटकार; रोहित शर्मा अन् श्रेयस अय्यर सांगणार मजेशीर किस्से

The Great Indian Kapil Show: 'द ग्रेट इंडियन कपिल शो' या कार्यक्रमाच्या दुसऱ्या एपिसोडचा प्रोमो रिलीज केला आहे. ज्यामध्ये क्रिकेटर रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) हे मजेशीर किस्से सांगताना दिसणार आहेत.

priyanka kulkarni

The Great Indian Kapil Show: नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवरुन कपिल शर्माचा (Kapil Sharma) सध्या 'द ग्रेट इंडियन कपिल शो' (The Great Indian Kapil Show) हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या कार्यक्रमाच्या पहिल्या एपिसोडने प्रेक्षकांचे मनोरंजन केले. अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) हा त्याची आई नीतू आणि बहीण रिद्धिमासोबत 'द ग्रेट इंडियन कपिल शो' या कार्यक्रमाच्या पहिल्या एपिसोडमघध्ये आला होता. आता 'द ग्रेट इंडियन कपिल शो' या कार्यक्रमाच्या दुसऱ्या एपिसोडचा प्रोमो रिलीज केला आहे. ज्यामध्ये क्रिकेटर रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) हे मजेशीर किस्से सांगताना दिसणार आहेत.

रोहित शर्मा म्हणाला, "हमारे लड़के सुस्त मुर्गे हैं"

'द ग्रेट इंडियन कपिल शो' या कार्यक्रमाचा नवीन प्रोमो रिलीज झाला आहे ज्यामध्ये कपिल शर्मा हा रोहित शर्माला विचारतो, 'आजकाल स्टंपवरही माइक लावले जातात, मग तू रागाच्या भरात कुणाला काही बोलायचं असेल तर कसा बोलतो?' यावर रोहित शर्मा उत्तर देतो, 'मी काय करू शकतो? हमारे लड़के सुस्त मुर्गे हैं। भागते नहीं हैं"

सुनील ग्रोव्हर रोहित शर्माला म्हणतो,"मला टीममध्ये घे"

'द ग्रेट इंडियन कपिल शो' या कार्यक्रमाच्या प्रोमोमध्ये सुनील ग्रोव्हर देखील दिसत आहे. तो रोहित शर्माला म्हणतो,"मला टीम इंडियामध्ये खेळायचं आहे. एक खेळाडू म्हणून मला संघात स्थान हवे होते.मला ओपनिंग दिली नाही तरी चालेल" यावर रोहित शर्मा म्हणतो,"ओपनिंग विसरून जा मित्रा."

पाहा प्रोमो:

प्रोमोमध्ये कपिल शर्मा हा नवज्योत सिंग सिद्धू यांच्या लूकमध्ये दिसत आहे. तसेच रोहित आणि श्रेयस हे दोघे कार्यक्रमाच्या मंचावर क्रिकेट खेळताना दिसत आहेत. 'द ग्रेट इंडियन कपिल शो' या कार्यक्रमाचा दुसरा एपिसोड  6 एप्रिल रोजी नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी! उद्धव ठाकरेंची युतीची घोषणा, म्हणाले, "दोघे भाऊ सत्ताधाऱ्यांना फेकून देणार"

Latest Maharashtra News Updates : आम्ही एकत्र आलो ते एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे

Raj Thackeray: निळा मफलर.. डोळ्यांवर गॉगल! राज ठाकरेंच्या 'लूक'मध्ये राजकीय संदेश? अमित ठाकरेही निळ्या शर्टवर

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT