The Great Indian Kapil Show esakal
Premier

The Great Indian Kapil Show: अन् दोन्ही भावांच्या डोळ्यात पाणी आलं; 'या' कारणामुळे कपिल शर्मा शोमध्ये सनी आणि बॉबी देओल झाले भावूक

The Great Indian Kapil Show: सनी आणि बॉबी यांनी द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शो या कार्यक्रमामध्ये हजेरी लावली. यावेळी सनीनं देओल कुटुंबाच्या यशाबद्दल सांगितलं.

priyanka kulkarni

The Great Indian Kapil Show: 2023 हे वर्ष देओल (Deol) कुटुंबासाठी खास होते. धर्मेंद्र (Dharmendra) यांचा 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' (Rocky Aur Rani Kii Prem Kahaani) हा चित्रपट रिलीज झाला तर सनी देओलच्या (Sunny Deol) 'गदर 2' (Gadar 2) या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर छप्परफाड कमाई केली. सनीचा भाऊ बॉबीनं 'ॲनिमल' या ब्लॉकबस्टर चित्रपटात अबरार ही भूमिका साकारुन प्रेक्षकांची मनं जिंकली. अशातच आता सनी आणि बॉबी यांनी द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शो (The Great Indian Kapil Show) या कार्यक्रमामध्ये हजेरी लावली. यावेळी सनीनं देओल कुटुंबाच्या यशाबद्दल सांगितलं.

सनी आणि बॉबी झाले भावूक

नुकताच द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शो या कार्यक्रमाचा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रोमोमध्ये दिसत आहे की, सनी हा देओल कुटुंबाच्या यशाबद्दल सांगताना भावूक झाला आहे. तो म्हणतो, '1960 मधून आम्ही लाइमलाइटमध्ये आहोत. आम्ही गेल्या काही वर्षांपासून प्रयत्न करत होता पण काहीच घडत नव्हतं. नंतर माझ्या मुलाचं लग्न झालं, त्यानंतर 'गदर' रिलीज झाला, त्याआधी माझ्या वडिलांचा चित्रपट आला यावर विश्वासच बसत नव्हता! त्यानंतर अॅनिमल रिलीज झाला. फट्टे ही चक दे!"

कठीण काळाबद्दल आणि यशाबद्दल सांगताना सनी देओल भावूक झाला. त्यानंतर सनीचं बोलणं ऐकून बॉबी देखील भावूक झाला.

सनी देओलनं त्याचे वडील धर्मेंद्र यांच्याबाबत देखील सांगितलं. ते म्हणाले, "माझे वडील मला म्हणतात की, माझ्यासोबत बस आणि मित्रासारख्या गप्पा मार. पण मी त्यांना म्हणतो, मी तुमच्याशी मित्रासारखे बोलतो पण तुम्ही वडिलांसारखे वागू लागता." सनी देओल यांचा हा किस्सा ऐकल्यानंतर सर्वजण हसू लागतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW Live: भारतीय संघाचे T20 World Cup मधून पॅकअप! ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय अन् दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत... हरमनप्रीत कौरच्या संघाला अपयश

IND vs IRE 2nd T20I : आयर्लंडने इतिहास रचला! भारतीय संघाला ट्वेंटी-२० मालिकेत नमवले, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाची लाजीरवाणी सुरुवात

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर वाढला मृत्यूचा धोका! टोल टाळण्यासाठी 'नो-एंट्री'तून वाहनांची सर्रास एंट्री; नियमांना हरताळ

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Vidarbha Rain Alert : विदर्भासाठी दिलासादायक बातमी! पावसाचा जोर वाढणार, ११ जिल्हे यलो अलर्टवर

SCROLL FOR NEXT