The Invisible Heroes Eijaz Khan on Female Actress Having ig career tham male actors marathi entertainment news  
Premier

Eijaz Khan : "इंडस्ट्रीमध्ये महिलांपेक्षा पुरुषांचं करिअर मोठं", एजाज खानच्या विधानाने वेधलं लक्ष

अभिनेता एजाज खान त्याने आजवर साकारलेल्या वेगवेगळ्या भूमिकांमुळे चर्चेत असतो.

सकाळ डिजिटल टीम

अभिनेता एजाज खान त्याने आजवर साकारलेल्या वेगवेगळ्या भूमिकांमुळे चर्चेत असतो. बऱ्याचदा त्याची काही विधानही सोशल मीडियावर चर्चेत राहतात. नुकत्याच एका मुलाखतीत त्याने केलेल्या विधानामुळे त्याने पुन्हा एकदा नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. अभिनेत्रींपेक्षा अभिनेत्यांना जास्त काळ इंडस्ट्रीत काम करता येत असं तो म्हणाला आणि त्याच्या विधानामुळे तो सोशल मीडियावर चर्चेत आहे.

त्याच्या नवीन रिलीज झालेल्या वेब शोच्या प्रोमोशनवेळी एजाजने इन्स्टंट बॉलिवूड या चॅनेलला मुलाखत दिली होती. यावेळी त्याला आणि दिव्यांका त्रिपाठीला जेव्हा तुम्ही टेलिव्हिजनवरून वेब शोसाठी काम करायला लागता तेव्हा तिथे काही अडथळा असतो का? असा प्रश्न विचारण्यात आला.

त्यावर दिव्यांकाने उत्तर दिलं कि,"अभिनेत्री एका काळापर्यंतच काम करू शकतात. मी माझं हे वाक्य अजून योग्य शब्दात मांडते. मी असं म्हणेन कि काही लोक मानतात कि मुली या इंडस्ट्रीत काही काळच काम करू शकतात. मग एका काळानंतर त्या थांबवतात आणि त्या त्यांच्या संसारात बिझी होतात." दिव्यांकाच्या या उत्तरावर एजाजनेही सहमती दर्शवत म्हंटलं कि, "अभिनेत्यांना अभिनेत्रींपेक्षा जास्त काळ काम करता येतं किंवा त्यांना जास्त काम करण्याची संधी या इंडस्ट्रीत मिळते. हो हे अजूनही आहे. हे कडवं आहे पण सत्य आहे. दुर्दैवाने किंवा सुदैवाने आम्हाला आमचं करिअर अजून पुढे न्यायला जास्त संधी मिळतात. पण हे खरं आहे." असं त्याने म्हंटलं.

सोशल मीडियावर एजाजचा हा व्हिडीओ व्हायरल झाला असून अनेकांनी कमेंट करत त्याच्या या विधानावर सहमती दर्शवली आहे.

दरम्यान एजाज आणि दिव्यांका यांची 'अद्रिश्यम- द इन्व्हिसिबल हिरोज' ही नवीन वेब शो नुकताच सोनी लिव्ह या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला आहे. या वेब शोमध्ये एजाज आणि दिव्यांका अंडरकव्हर इंटेलिजन्स अधिकाऱ्यांच्या भूमिकेत दिसणार आहेत.दर आठवड्याच्या गुरुवारी आणि शुक्रवारी रात्री ८ वाजता या वेब शोचा नवीन एपिसोड सोनी लिव्ह या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांना पाहायला मिळेल. ११ एप्रिल २०२४ ला शोचा पहिला एपिसोड रिलीज करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yashasvi Jaiswal Century: जैस्वालची सुरुवात अन् शेवटही शतकाने! इंग्लंडच्या गोलंदाजांना चोपत मोठ्या विक्रमालाही घातली गवसणी

Jaykumar Gore : पृथ्वीराज चव्हाण हे कऱ्हाडचे नेते नसुन देशाचे नेते आहेत, त्यांनी केलेल वक्तव्य हे त्यांना उशीरा सुचलेले शहानपण

ENG vs IND: 'बुमराह असो वा नसो, आमचं काम...', प्रसिद्ध कृष्णा जस्सीच्या न खेळण्यावर नेमकं काय म्हणाला?

Latest Maharashtra News Updates Live: इगतपुरी शहरात शनिवारी दुपारी पोलीसांचा रुट मार्च

Mumbai Traffic: मुंबईतील वाहतुकीत बदल, 'या' मार्गावर महिनाभर नो एन्ट्री; काय असतील पर्यायी मार्ग?

SCROLL FOR NEXT