Swatantrya Veer Savarkar esakal
Premier

Swatantrya Veer Savarkar: "ना रोक सकता गोरा, ना रोक सकता काला पानी", सावरकरांवर रॅप साँग लिहिणारा पुण्याचा 'संबाटा' आहे तरी कोण?

Swatantrya Veer Savarkar: सावरकरांच्या लढ्याचं वर्णन करणारं रॅप साँग 'संबाटा' नावाच्या पुण्याच्या तरुणानं लिहिलं आणि गायलं आहे.

priyanka kulkarni

Swatantrya Veer Savarkar: अभिनेता रणदीप हुड्डाचा (Randeep Hooda) 'स्वातंत्र्य वीर सावरकर' (Swatantrya Veer Savarkar) हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटातील रणदीप हुड्डाच्या (Randeep Hooda) अभिनयाचं अनेकजण कौतुक करत आहेत. तसेच या चित्रपटाच्या शेवटी ऐकायला येणाऱ्या रॅप साँगचं देखील कौतुक होत आहे. सावरकरांच्या लढ्याचं वर्णन करणारं रॅप साँग 'संबाटा' नावाच्या पुण्याच्या तरुणानं लिहिलं आहे. संबाटा या रॅपरचं खरं नाव काय? त्याची कोणकोणती गाणी प्रेक्षकांना आवडली? याबद्दल जाणून घेऊयात...

'स्वातंत्र्य वीर सावरकर' चित्रपटातील रॅप साँगचं होतंय कौतुक

संबाटाच्या 'स्वातंत्र्य वीर सावरकर' या चित्रपटातील रॅप साँगचं अनेक जण कौतुक करत आहेत. या रॅप साँगच्या लिरिक्सनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. "धर्म से है क्रांतिकारी, हौसला है तूफानी... ना रोक सकता गोरा, ना रोक सकता काला पानी", असे या रॅप साँगचे बोल आहेत. हे रॅप साँग संबाटानं लिहिलं आहे आणि गायलं देखील आहे. या रॅप साँगला The Savarkar Rage असं नाव देण्यात आलं आहे.

पाहा संपूर्ण रॅप साँग:

जाणून घ्या संबाटाबद्दल

सावरकरांवरील रॅप साँग लिहिणाऱ्या संबाटाचे खरे नाव प्रथम जोगदंड असं आहे. संबाटा हा पुण्याचा आहे. त्याचे काही रॅप साँग्स प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. काही काळातच संबाटा हा लोकप्रिय झाला. त्याचा चाहता वर्ग मोठा आहे.

पिन्नक, नको रास्ते चांगले,सोड लाचारीचा पक्ष या संबाटाच्या रॅप साँग्सला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. सध्या संबाटा हा त्याच्या 'स्वातंत्र्य वीर सावरकर' या चित्रपटातील रॅप साँगमुळे चर्चेत आहे.

संबाटा हा सोशल मीडियावर विविध पोस्ट शेअर करत असतो. त्याला इन्स्टाग्रामवर 253k फॉलोवर्स आहेत. संबाटाच्या रॅप साँग्सची त्याचे चाहते उत्सुकतेने वाट बघत असतात.

'स्वातंत्र्य वीर सावरकर' या चित्रपटाचं दिग्दर्शन रणदीप हुड्डानं केलं आहे. या चित्रपटानं रिलीजच्या पहिल्याच दिवशी जवळपास दीड कोटी रुपयांची कमाई केली. रणदीप हुड्डासोबतच या चित्रपटात अंकिता लोखंडे आणि अमित सियाल यांनी देखील काम केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT