Zapatlela 3 Poster
Zapatlela 3 Poster sakal
Premier

Zapatlela 3 Poster : ‘असा’ बनला झपाटलेला ३चा थरारक पोस्टर; सोशल मीडियावर व्हिडीओ चर्चेत

सकाळ वृत्तसेवा

सध्या सगळीकडे चर्चा आहे ती महेश कोठारे यांच्या ‘झपाटलेला’ या सिनेमाची. नुकतीच महेश कोठारे यांनी ‘झपाटलेला ३’ सिनेमाची घोषणा केली. सिनेमाची चर्चा सगळीकडे सुरु असतानाच सिनेमाचं पोस्टरसुद्धा चर्चेत आहे. अतिशय युनिक असलेल्या या पोस्टरने कमी कालावधीतच सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय. पोस्टरवर तात्या विंचूचा अर्धा चेहरा आणि अर्धा चेहरा आदिनाथचा पाहता येतोय. नुकतंच सत्यजित पाध्ये यांनी सोशल मीडियावर या पोस्टरचं मेकिंग सोशल मीडियावर शेअर केलं.

पहा व्हिडीओ:

https://www.instagram.com/p/C58bPFYNh7B/

या व्हिडिओमध्ये सत्यजित यांनी तात्या विंचूचा बाहुला आदिनाथच्या उंचीवर आधी धरल्याचे दिसून आलं आणि त्यानंतर आदिनाथने बाजूला येऊन तसाच फोटो काढला. त्यानंतर ते दोन्ही फोटो एडिट करून हे पोस्टर बनवण्यात आलं. सिनेमाच्या या हटके पोस्टरला 'मी तात्या विंचू...' असं कॅप्शन देण्यात आल्यामुळे यावेळी झपाटलेला ३मध्ये काहीतरी थरारक आणि तितकंच हटके कथानक पाहायला मिळणार असा अंदाज पोस्टरवरून येतोय.

काहीच दिवसांपूर्वी राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीमध्ये महेश यांनी ते लवकरच झपाटलेला ३ सिनेमा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याची बातमी जाहीर केली होती. "झपाटलेला चित्रपटाच्या फ्रँचायझीमधील दोन सुपरहिट चित्रपट दिल्यानंतर त्याच ताकदीचा किंबहुना त्याहून अधिक ताकदीचा पुढील चित्रपट देण्यासाठी आम्ही बांधील आहोत." असं ते या मुलाखतीमध्ये म्हणाले होते.

झपाटलेला २ मध्ये तात्या विंचू पुन्हा बाहुल्याच्या रूपात जिवंत झाला होता आणि मानवी शरीर मिळवण्यासाठी तो लक्ष्याचा मुलगा आदित्यचा शोध घेत असल्याचं दाखवण्यात आलं होतं. तर झपाटलेला ३ च्या शेवटी आदिनाथला तात्या विंचूला मारण्यात अपयश आल्याचं दाखवण्यात आलं. त्यामुळे यावेळी या सिनेमात काय वेगळा ट्विस्ट असणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. या सिनेमात आदिनाथने आदित्यची भूमिका साकारली होती आणि आता पुन्हा तिसऱ्या भागातही आदिनाथ याच भूमिकेत दिसणार आहे. झपाटलेला २ मध्ये अभिनेत्री सोनाली कुलकर्णीसुद्धा होती पण तिसऱ्या भागात ती काम करणार कि नाही हे अजून स्पष्ट झालं नाहीये. २०२५ या नवीन वर्षात झपाटलेला ३ सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत सरासरी 8 टक्के मतदान

Akshay Kumar: खिलाडी अक्षय कुमारनं भारताचं नागरिकत्व मिळाल्यानंतर पहिल्यांदाच केलं मतदान; म्हणाला, "माझा भारत देश हा..."

Latest Marathi Live News Update: सुनील राऊत पोलिसांवर भडकले

PM Modi : मतपेढीच्या तुष्टीकरणासाठी संस्थांना धमक्या; पंतप्रधानांची ममतांवर टीका

Standing Problems: तुम्हीही जास्त वेळ उभे राहत असाल तर वाढू शकतात 'या' समस्या

SCROLL FOR NEXT