tiger shroff  sakal
Premier

Tiger Shroff: बडे दिलवाला! अंथरुणाला खिळलेल्या क्रू मेंबरच्या मदतीला धावला टायगर श्रॉफ; आई आयेशा यांनीही केली विचारपूस

Tiger Shroff Helped Crew Member: लोकप्रिय बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ याने एका क्रू मेंबरची आर्थिक मदत केली आहे.

Payal Naik

अभिनेता जॅकी भगनानी आणि त्याचे वडील वासू भगनानी यांच्या पूजा एंटरटेनमेंटने अनेक कलाकार आणि सेटवरील कामगारांचे पैसे थकवले असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून समोर येत आहेत. कामगारांचे पैसे देण्यासाठी अभिनेता अक्षय कुमार याने त्याची फीदेखील घेतलेली नाही. अशातच आता पूजा एंटरटेनमेंटमध्ये काम करणाऱ्या एका कामगाराला अभिनेता टायगर श्रॉफने मदतीचा हात दिला आहे.

रवी कुमार असं त्या व्यक्तीचं नाव असून काही महिन्यांपूर्वी वासू भगनानी यांच्या 'मेरे हसबंड की बीवी' या चित्रपटाच्या सेटवर ते जखमी झाले होते. त्यानंतर आठ महिने हे अंथरुणाला खिळलेले आहेत. तेव्हापासून वासू भागणारी यांनी त्यांचे पैसेही थकवले आहेत. त्यांची जवळपास १ लाखांच्यावर रक्कम पूजा एंटरटेनमेंटने दिलेली नाही. आता अभिनता टायगर श्रॉफ याने त्यांची मदत केली आहे. रवी यांनी हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत ही माहिती दिली आहे.

या मुलाखतीत रवी म्हणाले, 'तो त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे की प्रोडक्शन हाउसने मला मदत नाही केली पण त्यांनी केली. मी त्यांच्या 'हिरोपंती' या चित्रपटासाठी काम केलं होतं. तर माझ्या वडिलांनी त्यांच्या वडिलांच्या म्हणजेच जॅकी श्रॉफ यांच्या चित्रपटासाठी काम केलं होतं. तेव्हा माझ्या वडिलांच्या हाताचं ऑपरेशन जॅकी यांनी करून दिलेलं. आता टायगर माझी मदत करतोय. त्यांच्या आईने मला फोन केलेला. त्या माझ्याशी बोलल्या.'

रवी यांनी टायगरने दिलेल्या मदतीचा आकडा सांगण्यास नकार दिला असला तरी ही मदत लाखांमध्ये आहे. रवी कुमार हे सेटवर फोकस पुलरचं काम करायचे मात्र अपघातानंतर त्यांना पुरेसं काम मिळणं बंद झालं. त्यात प्रोडक्शन हाउसने हात वर केल्याने त्यांना उपचारासाठी पैसे मिळेनासे झाले. प्रोडक्शन हाउसने आठ महिने त्यांना केवळ खोटी आशा दाखवली, फोन उचलले नाहीत असं रवी म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur News : सत्तेसाठी टोकाचे राजकारण; विरोधकांचा पत्ता कापण्यासाठी अनधिकृत बांधकाम ठरणार हत्यार

IPL 2026: सॅमसनमुळे ऋतुराजचे सलामीचे स्थान गेले...! अश्विनने निवडलेल्या CSK च्या प्लेइंग १२ मध्ये दिसेल नवीन ओपनिंग जोडी

VIDEO: धावत्या लोकलमधून तरुणीला फेकलं, नवी मुंबईतील धक्कादायक घटना, व्हिडिओ व्हायरल

Lionel Messi India Tour : 3 दिवसांच्या भारत दौऱ्यासाठी लिओनेल मेस्सीला किती कोटी रुपये मिळाले? पोलिस तपासात आयोजकाचा खुलासा

Latest Marathi News Live Update : पुण्यात आज भाजपच्या कोअर कमिटीची बैठक होणार

SCROLL FOR NEXT