Timepass 3 Actress Share Post esakal
Premier

Timepass 3 Fame Actress: ‘टाईमपास 3’ फेम अभिनेत्रीला झालाय 'हा' आजार; पोस्ट शेअर करत म्हणाली, "मी गरोदर नाहीये हे..."

Actress Health Update: कृतिका गायकवाडनं (Krutika Gaikwad) तिच्या हेल्थबाबत एक पोस्ट शेअर केली आहे.

priyanka kulkarni

Timepass 3 Actress Share Post: सेलिब्रिटी सोशल मीडियावरुन त्यांच्या वैयक्तिक आयुष्याच्या अपडेट्स चाहत्यांसोबत शेअर करत असतात. अशातच अनेक कलाकार हे त्यांच्या हेल्थबाबत देखील सोशल मीडियावर पोस्ट शेअर करतात. ‘टाईमपास 3’ (Timepass 3) या चित्रपटातील वाघाची डरकाळी या गाण्यातून घराघरात पोहोचलेल्या कृतिका गायकवाडनं (Krutika Gaikwad) देखील तिच्या हेल्थबाबत एक पोस्ट शेअर केली आहे. तिच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. या पोस्टच्या माध्यमातून कृतिकानं तिला झालेल्या आजाराबद्दल सांगितलं आहे.

कृतिकानं शेअर केली पोस्ट

कृतिकानं तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिचे काही फोटो दिसत आहेत, ज्यामध्ये तिचं पोट फुगलेलं दिसत आहे. या व्हिडीओला तिनं कॅप्शन दिलं, "मी गरोदर नाहीये हे गर्भाशयाचे फायब्रॉइड्स आहे जे काही वर्षात वाढले आहे! फायब्रीओड्स म्हणजे काय? फायब्रॉइड हा स्नायूंच्या ट्यूमर आहेत जो गर्भाशयामध्ये वाढतो. फायब्रॉइड्स बऱ्याच वेळा सौम्य असतात (कर्करोग नसतात). फायब्रॉइड असलेल्या सर्व महिलांमध्ये याची लक्षणे नसतात. ज्या स्त्रियांना लक्षणे दिसतात त्यांना सहसा फायब्रॉइड्ससह जगणे कठीण वाटते. काहींना वेदना होतात आणि मासिक पाळीत जास्त रक्तस्त्राव होतो. यातील काही वाढ लक्षात येत नाही.

"फायब्रॉइडमुळे गर्भाशयाच्या बाहेरील आणि आतील भागाला इजा होते. काही गंभीर केसेसमध्ये गाठी पेल्विस आणि पोटापर्यंत वाढतात. यामुळे तुम्ही गरोदर असल्यासारखं वाटू लागतं.महिलांनो सावध व्हा, तुमच्या हाताबाहेर जाण्यापूर्वी तुमच्या Gynac कडे जाऊन नियमित तपासणी करा", असंही कृतिकानं पोस्टमध्ये लिहिलं आहे.

कृतिकानं शेअर केलेल्या पोस्टला कमेंट करुन चाहत्यांनी तिच्या तब्येतीबाबत चिंता व्यक्त केली. तसेच "लवकर बरी हो!"असंही अनेक चाहत्यांनी तिला म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

State Government : मंत्रिमंडळाचा निर्णयांचा धडाका; निवडणूक आचारसंहितेपूर्वी घेतले २१ निर्णय

Maharashtra Governance : कायद्याबाहेरील कलमांवर दिला हद्दपारीचा आदेश; विभागीय आयुक्तांनी उपजिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय केला रद्द!

Sakal Karandak : पुणे विभागातून ‘बीएमसीसी’ महाअंतिम फेरीत सकाळ करंडक; विभागीय अंतिम फेरीचा समारोप

PMC elections : महापालिका निवडणुकीच्या मतदार यादीच्या वेळापत्रकात बदल; ६ ऐवजी १४ नोव्हेंबरला प्रारुप मतदार यादी जाहीर होणार!

ODI Record: भारतीय वंशाच्या क्रिकेटरचा अमेरिकेसाठी पराक्रम; विराटलाही मागे टाकत वनडेमध्ये रचला विश्वविक्रम

SCROLL FOR NEXT