Titanic Esakal
Premier

Titanic: 'टायटॅनिक'मधील 'त्या' आयकॉनिक दरवाज्याचा लिलाव; रोजच्या ड्रेसचीही लागली बोली

Titanic: टायटॅनिक हा चित्रपट आयकॉनिक चित्रपटांपैकी एक आहे. लोक आजही हा चित्रपट आवडीनं बघतात.

priyanka kulkarni

Titanic: काही चित्रपट असे असतात, ज्यांनी प्रेक्षकांच्या मनात एक विशेष स्थान निर्माण केलेले असते. टायटॅनिक (Titanic) हा चित्रपट त्याच चित्रपटांपैकी एक आहे. 1997 मध्ये प्रदर्शित झालेला टायटॅनिक हा चित्रपट आयकॉनिक चित्रपटांपैकी एक आहे. लोक आजही हा चित्रपट आवडीनं बघतात. या चित्रपटात लिओनार्डो डिकॅप्रियो (Leonardo DiCaprio) आणि केट विंसलेट (Kate Winslet) यांनी मुख्य भूमिका साकारली आहे. टायटॅनिक चित्रपटात दाखवण्यात आलेली रोज आणि जॅकची प्रेमकथेला प्रेक्षकांची पसंती मिळाली.आता या आयकॉनिक चित्रपटात वापरण्यात आलेल्या काही वस्तूंचा लिलाव करण्यात आला आहे.

रोजचा जीव वाचवणाऱ्या दरवाज्याचा लिलाव

टायटॅनिक हा चित्रपट ज्यांनी पाहिला असेल त्यांना या चित्रपटातील शेवटचा आयकॉनिक सीन नक्की आठवत असेल. या चित्रपटाच्या शेवटच्या सीनमध्ये ज्या दरवाज्यामुळे रोजचा जीव वाजतो त्या दरवाज्याचा आता लिलाव करण्यात आला आहे न्यूयॉर्क टाइम्सच्या रिपोर्टनुसार, हा दरवाजा $718,750 (सुमारे 5 कोटी रुपये) मध्ये विकला गेला आहे.

Titanic

केट विंसलेटच्या ड्रेसचा देखील लिलाव

रिपोर्टनुसार, टायटॅनिक या चित्रपटात अभिनेत्री केट विंसलेटनं परिधान केलेल्या ड्रेसचाही लिलाव करण्यात आला आहे. केटचा ड्रेसचा लिलाव $125,000 (सुमारे 99,00,205 रुपये) मध्ये झाला. पण टायटॅनिक या वस्तू खरेदी करणाऱ्यांची नावे अजून समोर आलेली नाहीत.

Titanic

जेम्स कॅमेरून यांनी टायटॅनिक या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. हा चित्रपट रिलीज होऊन जवळपास 27 वर्षे झाली आहेत, तरी देखील लोक आजही हा चित्रपट आवडीनं बघतात. या चित्रपटातील प्रेक्षक भूमिकेनं प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलं. या चित्रपटात लिओनार्डो डिकॅप्रियो, केट विंसलेट यांच्यासोबतच बिली झेन, कॅथी बेट्स, बिल पॅक्सटन, ग्लोरिया स्टुअर्ट या कलाकारांनी देखील महत्वाची भूमिका साकारली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT