sumant shinde from indrayani  esakal
Premier

'इंद्रायणी' मालिकेतील अभिनेत्याचा मोठा गौरव; इंदूच्या दत्तोबांची थेट राष्ट्रीय पुरस्काराला गवसणी, पोस्ट शेअर करत म्हणाला-

Colors Marathi Actor Sumant Shinde Won National Award: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'इंद्रायणी' मधील दत्तोबा म्हणजेच भिनत सुमंत शिंदे याचा राष्ट्रीय पुरस्काराने गौरव करण्यात आला आहे.

Payal Naik

कलर्स मराठीवरील लोकप्रिय मराठी मालिका 'इंद्रायणी' मधील कलाकाराने आपल्या कामाने थेट आकाशाला गवसणी घातली आहे. त्याचा राष्ट्रीय पुरस्काराने गौरव करण्यात आलाय. त्याच्या उत्कृष्ट कामासाठी त्याला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे. हा कलाकार आहे इंदूचे लाडके दत्तोबा म्हणजेच अभिनेता सुमंत शिंदे. मालिकेत साध्या भोळ्या, कायम इंदूची बाजू घेणाऱ्या, तिला सांभाळणाऱ्या दत्तोबांवर म्हणजेच सुमंतवर आता कौतुकाचा वर्षाव होतोय. त्याच्या ‘आदिगुंजन’ या चित्रपटासाठी सर्वश्रेष्ठ निवेदन आणि प्रकथनासाठी हा पुरस्कार त्याला मिळाला आहे. महत्वाचं म्हणजे गेल्या ७० वर्षाच्या इतिहासात या प्रवर्गातील हा पुरस्कार प्रथमच एका मराठी कलाकाराला मिळाला आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललितकला केंद्र गुरुकुल विभागातून नाटकाचे शिक्षण पूर्ण केलेल्या सुमंत शिंदे या मराठी अभिनेत्याला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ‘रजत कमल पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. नवी दिल्ली येथे पार पडलेल्या ७० व्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात ‘आदिगुंजन’ या चित्रपटासाठी सर्वश्रेष्ठ निवेदन आणि प्रकथनासाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्याने या सोहळ्याचा एक व्हिडिओ शेअर केलाय. त्याने हा व्हिडिओ शेअर करत लिहिलं, माझ्या पहिल्याच कामाला राष्ट्रीय पुरस्कारांच्या इतिहासातला पहिलाच मराठी चित्रपटाच्या निवेदनासाठीचा राष्ट्रीय पुरस्कार!' मी या भावना कशा व्यक्त करू. मला पाठिंबा देणाऱ्या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो. हे स्वप्न पूर्ण होण्यासारखं आहे. आणि हो ही फक्त सुरुवात आहे.'

हा पुरस्कार मिळाल्यानंतर त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्याच्या पोस्टवर आणि या यशाबाद्द्ल अनेकांनी त्याचं कौतुक केलं आहे. अनेक नेटकऱ्यांनी आणि कलाकारांनी कमेंट करत त्याचं कौतुक केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025: 'बुमराह जर UAE विरुद्ध खेळला, तर आंदोलन करेल', माजी भारतीय क्रिकेटपटूने कंल जाहीर

Yermala Crime : सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावर चालत्या ट्रकची ताडपत्री फाडून, लुटणाऱ्या सहा चोरट्याना अटक

Latest Marathi News Updates Live: बीडमध्ये हुंडाबळी प्रकरणात तीन आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल

Explained: भारतातील महिलांसाठी हृदय निरोगी राखण्याचा मार्ग – अँजाइनाबाबत सर्व महत्त्वाची माहिती

Cotton Import : कापूस आयात धोरण: जळगावच्या शेतकऱ्यांवर नेमका काय परिणाम होणार?

SCROLL FOR NEXT