trupti dimri  sakal
Premier

Tripti Dimri: भरभरून बोल्ड सीन्स दिल्याने ठरतेय टीकेची धनी, पण 'बॅड न्यूज'साठी तृप्ती डिमरीने किती घेतलंय मानधन?

Tripti Dimri Fees For Bad News Movie: लोकप्रिय अभिनेत्री तृप्ती डिमरी हिने ऍनिमल चित्रपटानंतर तिच्या मानधनात वाढ केली असल्याचं सांगण्यात येतंय.

Payal Naik

सध्या सोशल मीडियावर विकी कौशल आणि तृप्ती डिमरी यांच्या 'बॅड न्यूज' या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. या चित्रपटातील गाण्यांनी सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. त्यात तृप्ती आणि विकी यांच्या 'जानम' या गाण्याची चर्चा आहे. त्यातील बोल्ड सीन आता सगळीकडे व्हायरल होत आहेत. या चित्रपटात त्या दोघांची खूप चांगली केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे. मात्र या चित्रपटासाठी तृप्तीने किती मानधन घेतलंय हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. एका रिपोर्ट्सनुसार, 'ऍनिमल' नंतर तृप्तीने तिचं मानधन दुप्पट केल्या असल्याच्या चर्चा आहेत.

'ऍनिमल'नंतर तृप्तीकडे अनेक चित्रपटांच्या ऑफर आहेत. ती 'बॅड न्यूज'नंतर कार्तिक आर्यनसोबत 'भूल भुलैया ३'मध्येही दिसणार आहे. तृप्तीने 'ऍनिमल'साठी ४० लाख रुपये घेतले होते. त्यानंतर या चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर तिने आपल्या मानधनात वाढ केल्याचं सांगण्यात येतंय. तृप्तीने 'बॅड न्यूज' साठी ८० लाख ते १ कोटी रुपये मानधन घेतलं आहे. 'भूल भुलैया ३' साठीही तिने तितकीच फी घेतली असल्याचा दावा करण्यात आला आहे.

'ऍनिमल' चित्रपटानंतर तृप्ती प्रचंड लोकप्रिय झाली. तिला नॅशनल क्रश म्हणून संबोधलं गेलं. मात्र आता 'जानम' या गाण्यानंतर तिला ट्रोल केलं जातंय. या गाण्यामुळे तिला सॉफ्ट पॉर्न स्टार असंही म्हटलं जातंय. तिने यापूर्वी 'लैला मजनू', 'बुलबुल' आणि 'काला' या चित्रपटात मुख्य भूमिका साकारल्या आहेत. आता ती संदीप रेड्डी वांगा यांच्या 'ऍनिमल पार्क' मध्येही ती दिसणार आहे. तर तिचा 'भूलभुलैया ३' यावर्षी दिवाळीत येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नवले ब्रिजवरील वाहतूक ३ तासांनी सुरू; कोंडी सोडवण्यासाठी पोलिसांकडून बळाचा वापर, आंदोलकांमध्ये तीव्र नाराजी

Mumbai Indians Playoff Scenario: मुंबई इंडियन्सचे आव्हान संपुष्टात? आता काही केलं तरी प्ले ऑफमध्ये पोहोचणे अशक्य; हार्दिक पांड्याच्या नेतृत्वावर सवाल, CSK चं काय?

How Mumbai Indians Still Qualify for Playoff? हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली संघ नेमका कुठे कुठे चुकला? मुंबई इंडियन्सला १४ गुणांसह अव्वल चार मध्ये पोहोचता येईल का?

Dhamangaon Blaze: नागपूरमधील धामणगाव विद्यामंदिर गावात भीषण आग, ३०-४० घरे जळून खाक, लाखोंचे नुकसान

गोव्यात दारू प्यायल्यावर जास्त नशा का चढत नाही? ९९ टक्के लोकांना खरं कारण माहित नाही...

SCROLL FOR NEXT