Tripti Dimri  esakal
Premier

ती अशी कोणती मोठी सेलिब्रिटी आहे... जयपूरमध्ये तृप्ती डिमरीच्या पोस्टरला फासलं काळं; नेमकं प्रकरण काय?

Tripti Dimri Facing Immense Hate From Jaipur: अभिनेत्री तृप्ती डिमरीच्या पोस्टरला जयपूरमध्ये काळं फासण्यात आलंय. असं नेमकं अभिनेत्रीने केलंय तरी काय? वाचा ही बातमी.

Payal Naik

लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री तृप्ती डिमरी सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. 'ऍनिमल' नंतर तृप्तीच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली होती. त्यानंतर तिचा 'बॅड न्यूज' देखील प्रदर्शित झाला होता. आता तिच्याकडे चित्रपटांची रांग लागली आहे. लवकरच ती राजकुमार रावसोबत 'विकी विद्याका वो वाला व्हिडिओ' मध्ये दिसणार आहे. मात्र याच चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान असं काहीतरी घडलंय ज्यामुळे चाहते अभिनेत्रीवर चांगलेच संतापले आहेत. तिच्या पोस्टरला काळं फासण्यात आलंय सोबतच तिच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करणार असल्याचं देखील म्हटलं आहे. नेमकं प्रकरण काय आहे?

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यात एक महिला प्रचंड रागात दिसत आहे. ती म्हणते, 'कुणीही हिचे चित्रपट पाहणार नाही. कमिटमेंट करूनही हे लोक येत नाहीत. टाइम मॅनेजमेंट यायला हवी. कोणती मोठी सेलिब्रिटी झालीये ही. कोणाला माहीत आहे हिचं नाव.' तृप्तीने जयपूरमध्ये एका कार्यक्रमाला हजेरी लावण्यासाठी ५. ५ लाख घेतले होते. मात्र ती या कार्यक्रमासाठी गेलीच नाही. त्यानंतर या कार्यक्रमाच्या ऑर्गनायझरने तिच्यावर कायदेशीर कारवाई करणार असल्याची धमकी दिली आहे. या कार्यक्रमासाठी अर्धे पैसे घेतल्यानंतर अभिनेत्रींच्या मॅनेजरने त्यांना थोडावेळ थांबायला सांगितलं. आणि नंतर अभिनेत्रीने वेळ नसल्याने हा कार्यक्रम स्किप केला. ती कार्यक्रमाला गेलीच नाही.

सगळी तयारी झालेली असताना अभिनेत्री गेली नाही त्यामुळे त्या कार्यक्रमातील स्त्रियांनी तिच्या पोस्टरवर काळं फासलं.तृप्ती आणि राजकुमार यांचा 'विक्की और विद्या का वो वाला व्हिडीओ' ११ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. त्यानंतर ती कार्तिक आर्यनसोबत 'भूल भुलैया ३' मध्येही दिसणार आहे. तर ती सिद्धार्थ चतुर्वेदीसोबत 'धडक २' मध्येही दिसणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: फेरीवाल्यांसाठी आता पोलीस व्हेरिफिकेशन आणि क्यूआर कोड लायसन्स अनिवार्य; पुणे महानगरपालिकेचा मोठा निर्णय

IPL 2026: शुभमन गिलने विराटचा तो विक्रम मोडत नवा इतिहास घडवला; बटरनेही किंग कोहलीच्या यादीत मिळवलं स्थान

मृतदेह ताब्यात घेण्यास नकार हा अवमान नव्हे, उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय, चौकशीची मागणी करणाऱ्या महिलेवरील गुन्हा रद्द

Free FASTag Money: आता मिळणार 1,000 रुपयांचा FASTag फ्री! फक्त एक काम करायचं, सरकारची नवी भन्नाट योजना

शरद पोंक्षेंना तिसऱ्या स्टेज कॅन्सरची कल्पनाच नव्हती; पत्नीनं सांगितला किस्सा, स्वत: केले आयुर्वेदिक उपचार

SCROLL FOR NEXT