hina khan  sakal
Premier

Hina Khan Cancer: धक्कादायक! अभिनेत्री हीना खानला कर्करोगाचे निदान; स्तनाच्या कॅन्सरशी झुंज देतेय अभिनेत्री

Hina Khan Breast Cancer: अभिनेत्री हिना खान हिला कर्करोगाचं निदान झालं आहे.

Payal Naik

Hina Khan Diagnosed With Cancer: गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री हिना खान हिच्याबद्दल काही अफवा पसरल्या होत्या ज्यात तिला गंभीर आजाराची लागण झाल्याचं बोललं जात होतं. आता त्या अफवा खऱ्या ठरल्या आहेत. अभिनेत्रीला ब्रेस्ट कॅन्सरची लागण झाली आहे. हिनाने स्वतः एक पोस्ट करत याबद्दल माहिती दिली आहे. तिला स्टेज ३ ब्रेस्ट कॅन्सर झाल्याचे निदान झाले आहे. हिना ३६ वर्षांची आहे. तिच्याबद्दलच्या या बातमीने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. सध्या आपल्यावर उपचार सुरू असल्याचं तिने सांगितलं आहे.

हिना खानने एक इंस्टाग्राम पोस्ट करत तिच्या ब्रेस्ट कॅन्सरबद्दल सांगितलं आहे. तिने पोस्ट करत लिहिलं, 'नमस्कार, माझ्याबद्दल पसरलेल्या अफवा दूर करण्यासाठी, मला सर्व हिनाहोलिक आणि माझ्यावर प्रेम करणाऱ्या आणि काळजी घेणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसोबत काही महत्त्वाच्या बातम्या शेअर करायच्या आहेत. मला स्टेज थ्री ब्रेस्ट कॅन्सरचे निदान झाले आहे. हे माझ्यासाठी खूप अवघड आहे, मी प्रत्येकाला खात्री देऊ इच्छिते की मी या आजारावर मात करण्यासाठी वचनबद्ध आहे. मी अजिबात खचलेली नाहीये. आणि मी यातून बाहेर पडण्यासाठी आवश्यक ते सर्व काही करण्यास तयार आहे.'

तिने पुढे लिहिलं, 'या काळात तुम्ही माझ्या गोपिनीयतेचा आदर कराल. तुमच्या प्रेमाची, शक्तीची आणि आशीर्वादांची मला गरज आहे. तुमचा वैयक्तिक अनुभव, किस्सा आणि आश्वासक सल्ले माझ्यासाठी या प्रवासात खूप महत्वाचे ठरतील. मी देवाच्या कृपेने, माझ्या कुटुंबासह आणि माझ्या प्रियजनांसोबत या आव्हानावर मात करू शकेन आणि कृपया तुमच्या प्रार्थना, आशीर्वाद आणि प्रेम माझ्यासोबत राहूद्या.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sound System Ban : देव-देवतांच्या मिरवणुकीत आता 'या' गोष्टींना नो एन्ट्री; सरकारने काय दिले संकेत? संस्कृती जपण्यासाठी उचलणार कठोर पाऊल!

Latest Marathi News Live Update : लैंगिक शोषणाचे आरोप असलेल्या कॅप्टन खरातच्या ऑफिस बॉयवरही गुन्हा दाखल

CIDCO: आनंदाची बातमी! सिडकोने गृहकर्ज मर्यादा वाढवली; आता घर खरेदीचे स्वप्न पूर्ण होणार, व्याजदर अन् नवीन लिमिट किती?

Gudi Padwa 2026: भोपाळमध्ये 'मराठी' थाट! मुख्यमंत्र्यांनी घातली पेशवाई पगडी; ढोल-ताशांच्या गजरात गुढी उभारून केले नववर्षाचे स्वागत

Prajwal Revanna Case : 13 हजार पानांचं आरोपपत्र, 70 पेनड्राइव्ह, 39 आरोपी अन् अंगावर काटा आणणारे पुरावे; माजी खासदाराच्या 'त्या' अश्लील व्हिडिओंचं सत्य समोर!

SCROLL FOR NEXT