upendra limaye new car  sakal
Premier

Upendra Limaye: १०० टक्के मेड इन इंडिया! उपेंद्र लिमये यांनी खरेदी केली आलिशान कार; सहकुटुंब केली पूजा, पाहा व्हिडिओ

Upendra Limaye New Car: लोकप्रिय अभिनेते यांनी नुकतीच आलिशान कार खरेदी केली आहे.

Payal Naik

लोकप्रिय मराठमोळे अभिनेते उपेंद्र लिमये यांनी आपल्या जबरदस्त अभिनयाने आणि भारदस्त आवाजाने सिनेसृष्टीत वेगळं स्थान निर्माण केलं. त्यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर सिनेसृष्टीला स्वतःची दखल घ्यायला भाग पाडलं. फक्त मराठीतच नाही तर हिंदीतही त्यांचा वेगळा चाहतावर्ग आहे. 'ऍनिमल' या चित्रपटातून ते प्रचंड लोकप्रिय झाले तर 'मडगाव एक्सप्रेस' या चित्रपटातून त्यांनी प्रेक्षकांना आपल्या प्रेमात पाडलं. आता प्रेक्षकांच्या लाडक्या मेंडोज़ा भाईने चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे. उपेंद्र लिमयेंच्या घरी आणखी एका मेंबरचं आगमन झालं आहे. त्यांनी एक महागडी गाडी खरेदी केली आहे.

उपेंद्र यांनी गाडी घेतलेल्या कंपनीच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून त्यांचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांची मुलगी आणि मुलगा हे आपल्या नव्याकोऱ्या गाडीचा फर्स्ट लूक दाखवत आहेत. गाडीवरून कपडा बाजूला करताच उपेंद्र आणि त्यांची पत्नी गाडीची पूजा करताना दिसत आहेत. हळदकुंकू लावून नारळ फोडून ते गाडीचं सहकुटुंब स्वागत करत आहेत. त्यानंतर ते गाडीमध्ये बसताना दिसत आहेत. व्हिडिओच्या शेवटी ते सर्व्हिस देणाऱ्या व्यक्तींचे आभार मानताना दिसतात. या व्हिडिओला त्यांच्या 'ऍनिमल' चित्रपटातील वाक्य बॅकग्राउंड साउंड म्हणून लावण्यात आलं आहे.

गाडीची किंमत

त्यांनी महिंद्रा एक्सयूव्ही ७OO ही गाडी खरेदी केली आहे. त्यांनी गाडीचं ब्लॅक एडिशन घेतलं आहे. या गाडीची बाजारातील किंमत ही १३ लाखांपासून सुरू होतेय तर या गाडीचं टॉप मॉडेल हे २६ लाखांपर्यंत उपलब्ध आहे. त्यांची ही कार पाहून चाहते त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT