urmila matondkar  esakal
Premier

घटस्फोटाच्या चर्चांमध्ये दिवाळी पार्टीसाठी आली उर्मिला मातोंडकर; पण त्या गोष्टींवर खिळली नेटकऱ्यांची नजर, म्हणाले-

Urmila Matondkar Viral Video : लोकप्रिय अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिने नुकतीच मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीसाठी हजेरी लावली होती. मात्र नेटकऱ्यांच्या नजरा काही गोष्टींवर खिळल्या होत्या.

Payal Naik

बॉलिवूडचे लोकप्रिय फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा दरवर्षी बॉलिवूड कलाकारांसाठी दिवाळी पार्टीचं आयोजन करतात. या वर्षीही त्यांनी एका पार्टीचं आयोजन केलं होतं. या समारंभासाठी अनेक कलाकारांनी त्यांच्या घरी हजेरी लावली होती. रेखा, आलिया भट्ट, श्रद्धा कपूर यांसारख्या अनेक अभिनेत्रींनी देखील या कार्यक्रमाला हजेरी लावली. मात्र सगळ्यांच्या भुवया तेव्हा उंचावल्या गेल्या जेव्हा अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिने सुंदर सजून या कार्यक्रमात एंट्री केली. तिने आपल्या ड्रेसने लाइमलाइट तर लुटलीच पण तिला पाहून नेटकरीही आनंदी झाले. घटस्फोटाच्या निर्णयानंतर पहिल्यांदाच उर्मिला अशा कार्यक्रमात दिसली. मात्र एका गोष्टीने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, उर्मिलाने तिचा आठ वर्षांचा संसार मोडण्याचा निर्णय घेतलाय. ती आपला पती मोहसीन अख्तर मीरपासून घटस्फोट घेणार आहे. तिने पाच महिन्यांपूर्वीच घटस्फोटासाठी कोर्टात अर्ज दाखल केलाय. मात्र या गोष्टीची माहिती तिने चार महिन्यानंतर चाहत्यांना दिली. इटाइम्सने दिलेल्या माहितीनुसार, उर्मिलाने पाच महिन्यांपूर्वी घटस्फोटाचा अर्ज दाखल केलाय मात्र त्यांचा घटस्फोट हा परस्पर सहमतीने होत नाहीये. अशातच तिने मनीष मल्होत्रा यांच्या दिवाळी पार्टीत निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये हजेरी लावली. मात्र एका गोष्टीने सगळ्यांच लक्ष वेधून घेतलं ते म्हणजे या समारंभात तिने मंगळसूत्र आणि कुंकू लावलं नव्हतं. तिची लग्नाची अंगठीदेखील गायब होती.' त्यावरून सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.

उर्मिलाचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी अनेक कमेंट केल्या आहेत. एकाने लिहिलं, 'हीचं वय वाढतच नाहीये का?' दुसऱ्याने लिहिलं, 'ही कोणत्याही कपड्यात किती सुंदर दिसते.' आणखी एकाने लिहिलं, 'अरे बोटातली अंगठी गायब आहे हिची.' दुसऱ्याने लिहिलं, 'यांचं लग्न हे लग्न थोडीच असतं. आज लग्न उद्या घटस्फोट.' 'हिंदुस्तान टाइम्स'ने दिलेल्या रिपोर्टनुसार, उर्मिलाने मोहसीनपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला पण त्यामागचं कारण अजून समजू शकलेलं नाही. मात्र हा घटस्फोट परस्पर सामंजस्याने होत नाहीये.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: पुण्यात 'जय गुजरात'ची घोषणा; मुंबईत सारवासारव, अमित शहांसमोर दिलेल्या नाऱ्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

MP Naresh Mhaske : अर्बन नक्षल घुसखोरीवरून पुरोगामी नेत्यांची कोल्हेकुई; नरेश म्हस्केंची घणाघाती टीका

Loan Penalty: आरबीआयकडून मोठा दिलासा! आता कर्जाच्या प्री-पेमेंटवर दंड भरावा लागणार नाही, नियम कधीपासून लागू होणार?

Georai Crime : गायरान जमिन का कसता? असे म्हणून अदिवासी कुटुंबीयाना कु-हाडीने मारहाण; वडिलांसह माय-लेकी गंभीर जखमी

Latest Maharashtra News Updates : ज्वेलर्सचे सुरक्षा रक्षक भटक्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT