urmila matondkar  esakal
Premier

Urmila Matondkar Divorce: लग्नाच्या ८ वर्षांनंतर मोहसीन मीरपासून विभक्त होणार उर्मिला मातोंडकर? दाखल केला घटस्फोटाचा अर्ज

Urmila Matondkar Filed Divorce After 8 Years Of Marriage: लोकप्रिय अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिने पती मोहसीन मीर याच्यापासून वेगळं होण्यासाठी अर्ज दाखल केला असल्याची माहिती आहे.

Payal Naik

लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिला वेगळ्या ओळखीची गरज नाही. तिने आपल्या अभिनयाने बॉलिवूडमध्ये वेगळी छाप पाडली आहे. बॉलिवूडची छम्मा छम्मा गर्ल नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत राहिली आहे. उर्मिलाने तिच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपटात काम केलं. मात्र आता उर्मिलाच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. आता अभिनेत्री आपल्या पतीपासून विभक्त होणार असल्याचं बोललं जातंय. लग्नाच्या आठ वर्षानंतर तिने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केल्याचं सांगण्यात येतंय. उर्मिला ही पती मोहसीन अख्तर मीर याच्यापासून वेगळी होणार आहे. यामागचं नेमकं कारण ठाऊक नसलं तरी हा घटस्फोट सामंजस्याने होत नसल्याचं बोललं जातंय.

उर्मिलाने मोहसीन अख्तर मीरसोबत ४ फेब्रुवारी २०१६ रोजी एका खाजगी समारंभात लग्न केलं होतं. फक्त धर्म वेगळे असल्यामुळे नाही तर त्यांच्या वयात तब्बल १० वर्षांचं अंतर असल्यामुळेही ते दोघे चाहत्यांमध्ये चर्चेत होते. आता जवळपास ८ वर्ष एकमेकांसोबत राहिल्यानंतर त्यांच्या नात्यात कटुता निर्माण झाली आहे. आ त्या दोघांनी एकमेकांपासून दूर होण्याचा निर्णय घेतला आहे. अभिनेत्रीने पतीपासून विभक्त होण्यासाठी घटस्फोटाचा अर्ज दाखल केल्याची माहिती आहे तर काहींच्या म्हणण्यानुसार हा घटस्फोट सामंजस्याने होत नाहीये. अभिनेत्रीने वाजवुन या गोष्टीवर कोणतंही भाष्य केलेलं नाही.

कोण आहे उर्मिलाचा पती मोहसीन अख्तर मीर?

मोहसीन अख्तर मीर हा काश्मीरचा व्यावसायिक आणि मॉडेल आहे. ते दोघे पहिल्यांदा २०१४ मध्ये मनीष मल्होत्रा याच्या भाचीच्या लग्नात भेटले होते. तिथे त्यांच्यात मैत्री झाली. त्यानंतर उर्मिला आणि मोहसीन यांनी अमृतसरच्या स्वर्ण मंदिराचा दौरा केला आणि त्यानंतर निकाह केला. मोहसीन हा अभिनेता बनण्यासाठी काश्मीरहून मुंबईत आला होता, त्याने काही चित्रपटात आपलं नशीब आजमावलं मात्र यश न मिळाल्याने त्याने व्यावसायिक म्हणून आपलं नशीब आजमावलं. सध्या मोहसीन मनीष मल्होत्रा यांच्यासोबत काम करतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur News : कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या कुलगुरूंचं अपघाती निधन, पत्नीचाही मृत्यू; मूळ गावी जाताना घडली घटना

Latest Marathi News Updates : "नाशिकला संधी दिली आता मुंबईत संधी द्या" - अमित ठाकरे

Education Department : शिक्षक पुरस्काराबाबत उदासीनता; १० तालुक्यांतून केवळ दोन-दोनच प्रस्ताव

Crime News : ‘मुलबाळ होत नाही’ म्हणून विवाहितेचा छळ; धारदार हत्याराने वार करून जीवे ठार मारल्याचा आरोप

'क्रांतिज्योती विद्यालय-मराठी माध्यम’च्या शूटिंगला सुरुवात ! आदिती तटकरे यांच्या हस्ते मुहूर्त सोहळा संपन्न

SCROLL FOR NEXT