suraj chavan utkarsh shinde esakal
Premier

दिसाया जरी साधा... सुरजच्या विजयावर उत्कर्ष शिंदेने बनवलं जबराट गाणं; म्हणाला, 'ज्यांना जळत असेल त्यांनी'

Utkarsh Shinde New Song On Bigg Boss Marathi Winner 5 Suraj Chavan: लोकप्रिय गायक उत्कर्ष शिंदे याने सुरज चव्हाणच्या विजयावर एक जबरदस्त गाणं बनवलं आहे. ज्यावर नेटकरीही डुलत आहेत.

Payal Naik

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम 'बिग बॉस मराठी ५' चा ग्रँड फिनाले मोठ्या उत्साहात पार पडला. यात रीलस्टार सुरज चव्हाण याने बिग बॉसची ट्रॉफी आपल्या नावे केली. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात एकच जल्लोष करण्यात आला. या संपूर्ण प्रवासात अनेक कलाकारांनीही त्याला पाठिंबा दिला होता. त्यापैकी एक नाव म्हणजे उत्कर्ष शिंदे. उत्कर्षने सूरजला शिंदेशाही पाठिंबा जाहीर केला होता. जेव्हा सूरज जिंकला ही बातमी उत्कर्षला समजली तेव्हा त्याचा आनंद अनावर झाला होता. त्याने थेट स्टुडिओमध्ये जाऊन सूरजसाठी फक्त तासाभरात एक गाणं बनवलं. आता ते गाणं आणि उत्कर्षची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होतेय. या पोस्टमध्ये त्याने सुरजला वाईट म्हणणाऱ्यांना टोमणादेखील लगावला आहे.

उत्कर्षने पोस्ट करत लिहिलं, 'कासवाची आणि सश्याची शर्यत आठवली आज..”बनला आण बाण बिगबॉस ची शान आपला सूरज चव्हाण” आयुष्य जगून समजते. वाचून अथवा ऐकून नाही. बरेच जण म्हणाले सूरज ने काय वेगळं केल घरात? फक्त झापूक झुपूक तर केलं. आणि जिंकला त्यांना मला हेच सांगायचं आहे. घरात आपुलकी , मानसन्मान , कोणाचा निरादर नाही, कोणाची कधीकसलीच भीती नाही तर कोणा समोर माज गर्व नाही. की कोणा साठी मनात क्लेष नाही. जे होत स्वछ निर्मळ सरळ खोटं नाट नाहीच.एकाग्र सैयमी कासव उड्या मारणाऱ्या सश्यांना जसा हरवतो तसाच शांत एकाग्रतेने आपल्या खेळाशी एकनिष्ठ राहून ना लफडे ना झगडे फक्त १००% मेहनतीने आपला कासव सर्वांची मनेही जिंकण्यात आणि ट्रॉफी ही जिंकण्यात यशस्वी झाला.'

त्याने पुढे लिहिलं, 'आज मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदेजी ह्यांच्या कार्यक्रमात माझा परफॉर्मन्स असल्या कारणाने मध्ये मध्ये मोबाईलवरच @officialjiocinema वर बिगबॉस बघणं माझं सुरुच होत.आणि जसा सूरज जिंकला हे कळालं इतका आनंद झाला की कार्यक्रम संपवून घरी येऊन सरळ स्टुडिओत आलो आणि लगेच हे गाणं लिहलं रचला बनवलं संगीतबद्ध केलं, गायलं आणि लगेच आल्हादबरोबर वीडियो शूट केलं. १ तासात गाणं तयार.. सूरज जिंकल्याचं आनंद गाऊन नाचून साजरा केला.'

'@kedarshindems सर आपण दिलेल्या झापूक झुपूक चित्रपटाची ऑफर ऐकून खूप छान वाटलं. love you for this sir .लवकरच महागायक आनंद शिंदे ह्यांच्या आवाजात मी सूरजच गाण घेऊन येतोच आहे. सुरज मित्रा तू लवकर फ्री हो खूप नाचायचंय आणि नाचवायचंय आख्या महाराष्ट्राला. बाकी सूरज जिंकला म्हणून ज्यांना कुठे जळत असेल त्यांनी बर्नोल क्रीम ओईंटमेंट लावावे वाटल्यास त्याचे पैसे मी देईन.' उत्कर्षच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian student shot in USA : अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी गेलेल्या भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या झाडून हत्या!

Rohit Sharma: 'अद्भूत कर्णधार, टीम इंडियाला तू शिकवलंस की...' दिनेश कार्तिकचा रोहितच्या नेतृत्वाला सलाम; पाहा Video

30th Fenesta Open Tennis: महाराष्ट्राच्या वैष्णवी अडकरने जिंकले विजेतेपद; मनिष सुरेशकुमार पुरुष विभागात विजेता

सातारा अन् पालघर जिल्ह्यातील दोन न्यायाधीश सेवेतून बडतर्फ; नेमकं प्रकरण काय?

Phulambri Protest : शेतकऱ्यांच्या मदतीवरून काँग्रेस आक्रमक तहसीलदार व काँग्रेस कार्यकर्त्यांत बाचाबाची

SCROLL FOR NEXT