Vada Pav Girl esakal
Premier

Vada Pav Girl: ना अटक झाली, ना केस.. मग वडापाव गर्लला का घेऊन गेले दिल्ली पोलीस? व्हायरल व्हिडीओमागचं कारण जाणून घ्या

Vada Pav Girl: वडापाव गर्लला अटक करण्यात आली आहे, अशी चर्चा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर होऊ लागली. आता या संपूर्ण प्रकरणावर दिल्ली पोलिसांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

priyanka kulkarni

Vada Pav Girl: सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल, सांगताना येत नाही. सध्या 'वडापाव गर्ल' (Vada Pav Girl) ही सोशल मीडियावर चर्चेत आहे. वडापाव गर्लचं खरं नाव चंद्रिका गेरा दीक्षित, असं आहे. वडापाव गर्लचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अशातच आता तिचा आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, पोलीस वडापाव गर्लला घेऊन जात आहेत. वडापाव गर्लला अटक करण्यात आली आहे, अशी चर्चा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर होऊ लागली. आता या संपूर्ण प्रकरणावर दिल्ली पोलिसांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

पोलिसांनी सांगितलं सत्य

चंद्रिका गेरा दीक्षित उर्फ ​​'वडापाव गर्ल' गेल्या काही महिन्यांपासून दिल्ली येथील मंगोलपुरी भागात वडापावचा स्टॉल लावत आहे. तिच्या या स्टॉलचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहे, अशातच आता सोशल मीडियावर तिचा आणखी एका व्हिडीओ व्हायरल झाला. या व्हिडीओमध्ये काही महिला पोलीस अधिकारी हे वडापाव गर्लला घेऊन जाताना दिसले. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर चर्चा होऊ लागली की, वडापाव गर्लला अटक झाली आहे. आता पोलिसांनी या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. पोलिसांनी सांगितलं आहे की, वडापाव गर्लला अटक झालेली नाही, तसेच तिच्याविरोधात गुन्हा देखील दाखल झालेला नाही.

पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, वडापाव गर्ल ही एमसीडीच्या परवानगीशिवाय तिचा स्टॉल चालवतात आणि काही फूड ब्लॉगर्स आणि यूट्यूबर्सच्या पाठिंब्यामुळे ती इंस्टाग्रामवर व्हायरल झाली.

ना अटक झाली, ना केस..

काही दिवसांपूर्वी, वडापाव गर्लनं रस्त्यावर MCD च्या परवानगीशिवाय एका भंडाऱ्याचे आयोजन केले होते. ज्यामुळे वाहतूक कोंडी झाली लोकांची गैरसोय झाली. याबाबत तक्रार आल्यानंतर अधिकाऱ्यांनी तिला पोलीस ठाण्यात नेले होते, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. डीसीपी आऊटरच्या म्हणण्यानुसार, या वडापाव गर्लला अटक करण्यात आली नाही किंवा तिच्या विरोधात कोणाताही गुन्हा दाखल करण्यात आला नाही. एमसीडीने तिला फक्त चलन जारी केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jaysingpur Heavy Rain : जयसिंगपुरात ढगफुटीसदृश्य पावसाने हाहाकार; घरांमध्ये पाणी, कोल्हापूर-सांगली महामार्गावर फूटभर पाणी

Manchar News : वादळी वाऱ्यामुळे केळी, मका व आंबा पिकांचे मोठे नुकसान; प्रशासनाला पंचनामे करण्याच्या दिलीप वळसे पाटील यांच्या सूचना

MP Supriya Sule : ‘नरेटिव्ह’ पसरवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई का नाही?

अमरावतीत ट्विस्ट! महायुतीत बंडखोरी करणाऱ्या उमेदवाराचा अर्ज फेटाळला, आता रिंगणात चार उमेदवार, नेमकं काय घडतंय?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूळ गावाकडे शासनाचे दुर्लक्ष; स्मारकासाठी मंजूर केलेला दोन कोटींचा निधी गेला कुठं?

SCROLL FOR NEXT