varsha usgaonkar  esakal
Premier

Bigg Boss Marathi: तुला वाटेत झोपायला लावणाऱ्यांची हा महाराष्ट्र... वर्षा यांना दिलेल्या वागणुकीवर ऑनस्क्रीन लेक भडकला

Varsha Usgaonkar Treated Badly In Bigg Boss Marathi: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम 'बिग बॉस मराठी ५' मध्ये आता दोन ग्रुप झाले आहेत. तर वर्षा यांना दिल्या जाणाऱ्या वागणुकीवर अभिनेता भडकला आहे.

Payal Naik

Bigg Boss Marathi 5: 'बिग बॉस मराठी ५' सध्या प्रेक्षकांमध्ये प्रचंड व्हायरल झालाय. या सीझनमध्ये काही बदल करण्यात आलेत तर वेगवेगळे कलाकार घरात पाहायला मिळतायत. मात्र हा सीझन सगळ्यात जास्त गाजतोय तो निकी तांबोळीच्या भांडणांमुळे. सध्या घरात दोन ग्रुप झाले आहेत. या सीझनमध्ये अभिनेत्री वर्षा उसगावकर यांनीही एंट्री केली आहे, मात्र घरात त्यांना दिली जाणारी वागणूक पाहून अनेक नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला होता. निकी आणि तिचा ग्रुप मुद्दाम वर्षा यांना टार्गेट करत असल्याचं दिसत असल्याने आता कार्यक्रमावर टीकेची झोड उठली आहे. आता पुन्हा एकदा त्यांना अशीच वाईट वागणूक दिल्याने वर्षा यांचा ऑनस्क्रीन लेक भडकला आहे, त्याने एक पोस्ट करत याबद्दल संताप व्यक्त केलाय.

वर्षा या घरात खूप शांतपणे खेळताना दिसतायत. मात्र त्यांना मुद्दाम त्रास देण्याचं काम जान्हवी आणि निकी करत आहेत. यापूर्वी निकी त्यांच्या अंगावर ओरडताना दिसली त्यांना वाईट बोलताना दिसली, त्यांच्या वयाचा मान न राखता घाणेरड्या भाषेचा वापर करत त्यांना उलट सुलट बोलताना दिसली. हद्द तर तेव्हा झाली जेव्हा वर्षा यांना मुद्दाम प्लॅन करून खाली झोपवण्यात आलं तेही चालण्याचा रस्त्यावर. बिग बॉसच्या घरात रस्ता असलेल्या ठिकाणी त्यांना झोपायला लावलं गेलं. हे पाहून त्यांचा ऑनस्क्रीन लेक कपिल होनराव चांगलाच भडकला आहे. कपिल याने 'सुख म्हणजे नक्की काय असतं' या मालिकेत वर्षा यांच्या मुलाची म्हणजे मल्हारची भूमिका साकारली होती.

आता त्यांना या अवस्थेत पाहून त्याने एक पोस्ट केली आहे. त्याने माईसोबतचे फोटो शेअर करत लिहिलं, 'स्ट्रॉन्ग राहा माई, ते तिला खूप जास्त घाण वागणूक देतायत, तिला वाईट पद्धतीने छळतायत. ज्यांनी तुला वाटेत झोपायला लावलं त्यांची वाट नक्की लावेल हा महाराष्ट्र.. माझी आशा आहे रितेश भाऊ बरोबर क्लास घेतील ह्या सगळयांची ...' कपिलच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी देखील त्याची बाजू घेतली आहे. एका नेटकऱ्याने प्रतिक्रिया देत लिहिलं, 'खूप वाईट वाटतं वर्षा यांना इतक्या खालच्या थरावर जाऊन बोलतात हे ऐकताना, अरे चाटा म्हणजे काय? ही काही भाषा झाली का? ते ही आपल्यापेक्षा मोठ्या व्यक्तीला, अरे तुमचा जेवढ वय नाही ना तेवढी वर्ष त्यांनी ह्या इंडस्ट्रीमध्ये घालवली आहेत, लाजा बाळगा,'

आणखी एकाने लिहिलं, 'मी वर्षा ताईसोबत आहे. त्यांचा खूप अपमान होतो आहे.' आणखी एकाने लिहिलं, 'अरे त्यांनी जेवढा मान कमावला तेवढा आजच्या या पोरांना जमणार पण नाही.' अशा अनेक प्रतिक्रिया नेटकरी देत आहेत. आता आजच्या भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुख नेमकं कुणाला बोलणार याकडे सगळ्याचं लक्ष लागलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Virar Building Collapse: विरार इमारत दुर्घटनेत आतापर्यंत १५ जणांचा मृत्यू; ३२ तासानंतरही रेस्क्यू ऑपरेशन सुरुच

Latest Marathi News Updates : अभिनेता शाहरूख खानसह अभिनेत्री दीपिका पदुकोण यांच्याविरोधात गुन्हा दाखल, काय आहे कारण?

Rain Update: 'सोलापूर जिल्ह्यात परतीच्या पावसाचे दिवस वाढणार'; शनिवारपासून पूर्वा नक्षत्र, गणरायाचे पावसात स्वागत

Ganesh festival २०२५: 'गणरायांच्‍या आगमनाने आनंदवर्षा'; सातारा जिल्ह्यात वरुणराजाच्‍या विश्रांतीने उत्‍साहाला उधाण

Karad Accident: 'राष्ट्रीय महामार्गावर ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार'; भीषण धडकेने हेल्मेट तुटलं अन्..

SCROLL FOR NEXT