Bigg Boss Marathi Season 5 Esakal
Premier

Bigg Boss Marathi Season 5 : "आता तुझ्या लेकराला कोण बघणार ?", जीवलगांशी फोनवर बोलताना सदस्य ढसाढसा रडले

Bigg Boss Marathi Season 5 Latest Update : कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सीजन ५ मध्ये घरी फोन लावताच सदस्यांना अश्रू अनावर झाले. काय घडलं नेमकं जाणून घेऊया.

सकाळ डिजिटल टीम

Bigg Boss Marathi Latest Update : कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सीजन ५ खूप गाजतोय. घरातील प्रत्येक सदस्यांना फक्त तीन आठवड्यांमध्ये स्वतःचं एक वेगळं स्थान बिग बॉस मराठीच्या घरात निर्माण केलं आहे. घरातील सदस्यांना आज त्यांच्या आयुष्यातील जवळच्या व्यक्तीशी बोलण्याची संधी मिळाली. नेमकं काय घडलं जाणून घेऊया.

बिग बॉस मराठी सीजन ५ चा नवीन प्रोमो नुकताच शेअर करण्यात आला. या प्रोमोमध्ये 'बिग बॉसने घरातील सदस्यांना फोनवरून त्यांच्या जीवलगांशी संवाद साधण्याची संधी दिल्याचं पाहायला मिळालं. कन्फेशन रूममध्ये ठेवलेल्या या फोनवरून सदस्यांनी त्यांचं बोलणं राहून गेलेल्या किंवा त्यांच्या जवळच्या व्यक्तीशी संवाद साधायचा होता.

सोशल मीडियावर शेअर केलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळालं कि, घरच्यांशी संवाद साधताना सदस्य ढसाढसा रडले. वर्षा उसगावकर यांनी त्यांच्या वडिलांना फोन लावला ."मला तुझी खूप आठवण येते पप्पा" असं म्हणत त्यांना अश्रू अनावर झाले. तर जान्हवी, अरबाज , छोटे पुढारी, पॅडी हे सुद्धा खूप रडले. सुरजने त्याच्या दिवंगत आईला फोन लावला होता. "आता तुझ्या लेकराला कोण बघणार ?" असं म्हणत सुरजने त्याच्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली.

हा टास्क देण्यामागे नेमकं काय कारण असेल ? सदस्यांच्या इमोशन्सची कसोटी आता पाहायला मिळणार का ? हे आगामी भागात समजेल. तेव्हा पाहायला विसरू नका बिग बॉस मराठी सीजन ५ दररोज रात्री ९ वाजता फक्त कलर्स मराठीवर आणि जिओ सिनेमावर कधीही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table : लखनौ सुपर जायंट्सचा पराभवाचा चौकार; राजस्थान रॉयल्स विजयासह गुणतालिकेत थेट दुसऱ्या क्रमांकावर

Steve Smith Century: १८ चेंडूंत ८४ धावा! स्टीव्ह स्मिथने पाकिस्तानी गोलंदाजांना 'सोलले'; PSL २०२६ मधील वेगवान शतक झळकावले

Pune Cyber Fraud News : विवाह संकेतस्थळावर इस्रो शास्त्रज्ञ बनून २६.५० लाखांची फसवणूक; तोतया आरोपी येरवडा पोलिसांच्या जाळ्यात

Pune Accident : पुण्यात दत्तवाडीत घराच्या दरवाजावर पडलेल्या विजेच्या तारेचा जबर धक्का; मुलीला वाचवताना आईही जखमी

Maharashtra Sarkari Karmachari Strike: रायगडसह राज्यात शासकीय कामकाज ठप्प; सकारात्मक चर्चेनंतरही कर्मचाऱ्यांचा संप उद्याही सुरूच

SCROLL FOR NEXT