varun dhawan and natasha became parents daughter Sakal
Premier

Varun Dhawan : वरुण धवन झाला बाबा; पत्नी नताशानं दिला मुलीला जन्म

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता वरुण धवन हा बाबा झाला आहे. त्याची पत्नी नताशा दलालनं गोंडस मुलीला जन्म दिला आहे.

ऋषिकेश साळवी (Rushikesh Salvi)

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता वरुण धवन हा बाबा झाला आहे. त्याची पत्नी नताशा दलालनं गोंडस मुलीला जन्म दिला आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून वरुणने ही आनंदाची बातमी चाहत्यांना दिली आहे

वरुण धवनचे वडील, डेव्हिड धवन हे रुग्णालयाच्या बाहेर स्पॉट झाले, यावेळी प्रसारमाध्यमांना त्यांनी ही आनंदाची बातमी दिली. यावेळी पापाराझीने “लक्ष्मी आली आहे”, असे म्हणत डेव्हिड धवन यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी आजोबा डेव्हिड धवन काहीसे भावूक झालेले पाहायला मिळाले. घरात बाळ आल्याचा आनंद धवन कुटूंबाच्या चेहऱ्यावर दिसत होता. सकाळपासून वरुण हॉस्पिटलमध्ये बायकोबरोबर होता त्यानंतर धवन कुटूंबाने हजेरी लावली.

काही दिवसांपूर्वीचं धवन कुटूंबाने नताशचा बेबी शॉवर दणक्यात साजरा केला होता. वेस्टर्न थीम या पार्टीची होती आणि ही पार्टी खास वरुणच्या आई- बाबांनी आयोजित केली होती. त्यांचे अनेक जवळचे मित्र मंडळी या पार्टीला उपस्थित होते. पार्टीतील नताशा आणि वरुणच्या कॅज्युअल लुकने लक्ष वेधून घेतलं होतं.

काही महिन्यांपूर्वी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत वरुणने तो बाबा होणार असल्याची बातमी शेअर केली होती. ही बातमी त्याने शेअर करताच अनेकांनी त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला होता. नताशा आणि वरुणचं 2021 मध्ये लग्न झालं. अतिशय कमी लोकांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी लग्न केलं. या आधी बराच काळ वरुण नताशाला डेट करत होता. नताशा एक फॅशन डिझायनर आहे.

करण जोहरच्या 'स्टुडंट ऑफ द इयर' सिनेमातून वरुणने पदार्पण केलं. त्यानंतर त्याने कलंक, बदलापूर, भेडीया, हंप्टी शर्मा की दुल्हनिया, बद्रीनाथ की दुल्हनिया, जुडवा 2, कुली नंबर 1 या सिनेमांमध्ये काम केलं. कलंक सिनेमातील त्याच काम गाजलं. आता स्त्री 2 आणि बेबी जॉन या सिनेमांमधून वरुण प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. नताशच्या प्रेग्नेंसीमुळे वरुणने यावर्षी सिनेविश्वापासून थोडा ब्रेक घेतला असून त्याने फार कमी सिनेमांमध्ये काम केलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

Pune Illegal PG Hostels : लोहगावमध्ये ११ बेकायदेशीर पीजी हॉस्टेल सील; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या जागामालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Gambling Raid : गंगापूरमध्ये रम्मी जुगार अड्ड्यावर धाड; १.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांसह चौघांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT