Varun Dhawan esakal
Premier

Varun Dhawan: थाटात पार पडलं वरुण धवनच्या बायकोचं बेबी शॉवर; सोशल मीडियावर फोटो व्हायरल

Varun Dhawan: नुकतंच धवन कुटूंबाने नताशासाठी बेबी शॉवर पार्टी आयोजित केली आहे. या पार्टीचे फोटोची चर्चा सध्या नेटकऱ्यांमध्ये रंगली आहे.

priyanka kulkarni

Varun Dhawan: बॉलिवूड अभिनेता वरूण धवन (Varun Dhawan) लवकरच बाबा होणार आहे. काही दिवसांपूर्वीच त्याने त्याची पत्नी नताशा दलाल (Natasha Dalal) प्रेग्नेंट असल्याची बातमी सोशल मीडियावर शेअर केली होती. नुकतंच धवन कुटूंबाने नताशासाठी बेबी शॉवर पार्टी आयोजित केली आहे. या पार्टीचे फोटोची चर्चा सध्या नेटकऱ्यांमध्ये रंगली आहे.

या पार्टीला धवन कुटूंबियांचा मित्रपरिवार आणि नातेवाईक उपस्थित होते. नताशाने या पार्टीसाठी ऑफ शोल्डर फ्रॉक वेअर केला होता तर वरुणने व्हाईट टीशर्ट आणि त्यावर ब्लु प्रिंटेड शर्ट वेअर केला होता.

शाहिद कपूरची बायको मीरा कपूरने सुद्धा या पार्टीला हजेरी लावत या जोडीचं अभिनंदन केलं. दुबईमधील एक इव्हेंटमध्ये एकत्र डान्स केल्यानंतर शाहिद आणि वरुणची घट्ट मैत्री झाली आहे तर त्यांच्या फॅमिलीमध्ये सुद्धा चांगले संबंध निर्माण झाले आहेत. तर वरुणचे आई -बाबासुद्धा ही पार्टी एन्जॉय करताना दिसले.

नताशा आणि वरुणने या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या पापराझींसाठी देखील खास गिफ्ट पाठवले. बाळाच्या आगमनाच्या खुशीत वरुण आणि नताशाने मिठाई वाटली.

फेब्रुवारी महिन्यात वरुणने सोशल मीडियावर नताशासोबतचा फोटो पोस्ट करत ते दोघेही लवकरच आई-बाबा बनणार असल्याची बातमी जाहीर केली होती. वरुणने नताशच्या बेबी बंपला किस करतानाचा फोटो शेअर केला होता. त्याने ही बातमी शेअर केल्यावर चाहत्यांनी त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला.

या जोडीने 24 जानेवारी 2021 ला लग्नगाठ बांधली. त्या आधी बराच काळ ते दोघं एकमेकांना डेट मदत होते.

तसंच वरुण लवकरच 'बेबी जॉन' या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. दिग्दर्शक अटलीच्या गाजलेल्या थेरी सिनेमाचा हा हिंदी रिमेक आहे. या शिवाय वरूण वेबसिरीजमध्ये काम करतोय. हॉलिवूडच्या गाजलेल्या 'सिटाडेल' या वेबसिरीजचा पूर्वार्ध या वेबसिरीजमध्ये दिसणार असून सिटाडेल हनी बनी असं या वेबसिरीजचं नाव आहे. राज आणि डीके ही जोडी या सिरिजचं दिग्दर्शन करतेय. या सिरीजमध्ये तो समांथासोबत स्क्रीन शेअर करणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पहिल्याच सामन्यात शतक, आता विराट कोहली, रोहित शर्मा यांचा Vijay Hazare Trophy मधील पुढील सामना कधी? वाचा सर्व डिटेल्स

Shukra Gochar 2026: वर्षाच्या पहिल्याच गोचरमध्ये ‘या’ राशींचं नशीब फुलणार, करिअरला मिळणार मोठी उंची

प्रसिद्ध मराठी अभिनेता अडकला लग्नबंधनात, सोशल मीडियावर फोटो व्हायरल, पत्नी आहे तरी कोण?

Panchang 25 December 2025: आजच्या दिवशी हळद, बेलफळ चूर्ण किंवा आवळकाठी चूर्ण पाण्यात टाकून स्नान करावे

Kolhapur Election : माजी नगरसेवकांनी शड्डू ठोकल्याने चुरस; मतांची गोळाबेरीज करण्याचे आव्हान, मताधिक्य कोणाला याचीच उत्सुकता

SCROLL FOR NEXT