Ashok Saraf About His Popularity Esakal
Premier

Ashok Saraf : "म्हणून, मी अजूनही प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय"; अशोक मामांनी उलगडलं त्यांच्या यशाचं रहस्य, म्हणाले...

Ashok Saraf revealed his secret formula of success : अभिनेते अशोक सराफ यांनी त्यांच्या यशाचं आणि लोकप्रियतेचं रहस्य अखेरीस उलगडलं. काय म्हणाले अशोक सराफ जाणून घेऊया.

सकाळ डिजिटल टीम

Ashok Saraf Interview : मराठी इंडस्ट्रीमधील एव्हरग्रीन व्यक्तिमत्त्व म्हणून अशोक सराफ यांनी स्वतःची ओळख बनवली आहे. वयाची ७५ ओलांडली तरीही सतत हसतमुख चेहरा आणि तितक्याच तडफेने काम करण्याची त्यांची वृत्ती याच कौतुक सगळ्यांना आहे. अशोक सराफ यांनी मराठीबरोबरच हिंदी आणि साऊथ इंडियन फिल्म इंडस्ट्रीमध्येही काम केलं.

कधी विनोदी, कधी गंभीर भूमिका साकारून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारे अशोक सराफ हे मराठी सिनेविश्वातील खरे अभिनयाचे बादशाह आहेत असं म्हणायला हरकत नाही. आजही त्यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे, इतकंच नाही तर त्यांच्या जुन्या सिनेमांच्या सीन्स बनणारे मिम्स आणि व्हिडीओ तरुण प्रेक्षकांमध्येही लोकप्रिय आहेत.

नुकताच अशोक सराफ यांनी 'मित्र म्हणे लाइमलाईट' या चॅनेलला मुलाखत दिली. यावेळी सिनेविश्वातील विविध गोष्टींवर भाष्य केलं. तर मराठी सिनेमाचं यश, त्यांनी गाजवलेल्या एकांकिका स्पर्धा या बद्दलही मामा दिलखुलासपणे बोलले.

यावेळी त्यांना अजूनही प्रेक्षक त्यांना एव्हरग्रीन का म्हणतात ? त्यांची लोकप्रियता अजूनही का टिकून आहे असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर अशोक सराफ म्हणाले कि,"दोन गोष्टींवर तुमची प्रसिद्धी, तुमचं यश अवलंबून असतं असं मला वाटतं. एक म्हणजे तुमचा प्रामाणिकपणा. तुम्ही तुमच्या कलेशी किती प्रामाणिक आहात याने तुमच्या कामाचा दर्जा ठरतो. तो दर्जा लोकांना आवडला तर तुम्ही पुढे जाता. दुसरी गोष्ट आहे तुम्ही लोकांशी कसे वागता ? तुम्ही स्वतःला लोकांसमोर कसं सादर करता, त्यांच्याशी कसं वागता हे महत्त्वाचं आहे. माझ्याशी जी लोकं मैत्री करायला , भेटायला येतात, जे माझे चाहते भेटायला येतात त्यांच्याशी मी आदराने वागतो. त्यांच्याशी चांगलं बोलतो. मला कधीच कुणाचा अपमान करायला जमत नाही आणि मी कधीच मला भेटायला येणाऱ्या लोकांचा अपमान करत नाही. जे फॅन्स मला भेटायला येतात ते उगाच नाहीयेत फॅन्स. हे फॅन्स कमावण्यासाठी कित्येक लोकं धडपडतात. ते मला देवाच्या दयेने मिळालं आहे तर मी ते कसं सोडू ? का मी त्यांचा अपमान करू ? याचसाठी मी जास्त प्रसिद्ध आहे. रस्त्याने जाणाऱ्या माणसाने जरी मला नमस्कार केला तरीही मी नमस्कार करतो. "

या शिवाय सध्या त्यांची गाणी किंवा जुन्या सिनेमांचे मिम्स सोशल मीडियावर प्रसिद्ध झाले आहेत ते आवडत असल्याचं अशोक सराफ यांनी यावेळी सांगितलं. माझ्या कलाकृतीकडे आताच्या तरुणाईचा बघण्याचा दृष्टिकोन आवडतो असं ते यावेळी म्हणाले.

अशोक सराफ यांचा 'लाईफलाईन' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. २ ऑगस्ट २०२४ ला हा सिनेमा रिलीज होणार असून या सिनेमात माधव अभ्यंकर यांचीही मुख्य भूमिका आहे. या सिनेमात अशोक सराफ हे एका डॉक्टरच्या भूमिकेत दिसणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

रोहित शर्माकडून ODI कर्णधारपदाची जबाबदारी हाती घेतल्यानंतर Shubman Gill ची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, '२०२७ वर्ल्ड कपमध्ये...'

Gautami Patil Missing? : गौतमी पाटील ''गेली कुठं गावना...'' ; पुणे पोलिसांची नोटीस मिळाल्यापासून गायब!

Manoj Jarange: ''मराठा नेते, अधिकारी, उद्योगपतींना बावनकुळे त्रास देत आहेत'', ओबीसी बैठकीनंतर जरांगेंचा हल्ला

Quick Mushroom-Spinach Omelette: हलक्या भूकेसाठी सोल्यूशन हवं आहे? मग ट्राय करा झटपट तयार होणारं मशरूम-पालक ऑम्लेट

Latest Marathi News Live Update : दलित असल्याचे सांगताच रुम नाकारली, वंचितच्या पदाधिकाऱ्याची तक्रार

SCROLL FOR NEXT