Rekha was offered role of Mallika jaan 
Premier

Manisha Koirala : उमरावजान साकारणार होती मल्लिकाजान ? मनीषाने सांगितली 18 वर्षांपूर्वीची गोष्ट

Veteran actress Rekha was offered the role of Mallikajaan : अभिनेत्री रेखा यांना हिरामंडीमधील मल्लिकाजान हा रोल ऑफर करण्यात आल्याचा खुलासा अभिनेत्री मनीषा कोईरालाने केला.

सकाळ डिजिटल टीम

संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) दिग्दर्शित 'हिरामंडी द डायमंड बझार' ही नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेली वेबसिरीज सध्या खूप गाजतेय. अभिनेत्री मनीषा कोईरालाने (Manisha Koirala) साकारलेल्या मल्लिकाजान या पात्राची सगळेचजण तारीफ करत आहेत. हिरामंडीच्या बझाराची हुजूर असलेली मल्लिकाजान आणि तिची अदा याने प्रेक्षकांना वेड लावलंय. ज्येष्ठ अभिनेत्री रेखा यांनीही मनीषाचं कौतुक केलं.

बऱ्याच वर्षांनी मनीषाने रुपेरी पडद्यावर कमबॅक केला. तिने साकारलेलं मल्लिकाजानचं पात्र सुपरहिट झालं आणि आता मनीषाने एका मुलाखतीमध्ये या कॅरेक्टरविषयी एक महत्त्वाचा खुलासा केला. मल्लिकाजान या रोलसाठी मनीषाची नाही तर कोणत्यातरी दुसऱ्याच अभिनेत्रीची निवड आधी करण्यात आली होती.

नुकतंच मनीषाने 'फिल्मीज्ञान' या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. यावेळी ती म्हणाली, "रेखा (Rekha) यांना ही भूमिका १८-२० वर्षांपूर्वी ऑफर करण्यात आली होती. रेखा यांनी जेव्हा मला मल्लिकाजान ची भूमिका संजय लीला भन्साळी यांच्या शोमध्ये साकारताना पाहिलं तेव्हा त्यांनी मला दुसऱ्या दिवशी फोन केला आणि म्हणाल्या,"बच्चा, मी प्रार्थना करायचे कि ही भूमिका जर मी केली नाही तर तू केली पाहिजेस आणि माझी प्रार्थना खरी झाली. तू खूप सुंदर काम केलं आहेस. तू आयुष्यात खूप काही करू शकतेस आणि तू या चरित्रभूमिकेला जिवंत केलं आहेस." हे ऐकल्यावर मनीषाच्या डोळ्यात पाणी आलं.

मनीषाने केलं रेखा यांचं कौतुक

रेखा यांच्या सारख्या दिग्गज अभिनेत्रीचा आशीर्वाद माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे असं मनीषा यावेळी म्हणाली. "रेखा जी या देवीसारख्या आहेत. माझं त्यांच्यावर खूप प्रेम आहे. त्या खूपच सुंदर व्यक्तिमत्त्व आहेत." असं मनीषा रेखा यांचं कौतुक करताना म्हणाली.

प्रेक्षकांना अशी वाटली वेबसीरिज

१ मे २०२४ ला हिरामंडी द डायमंड बझार ही वेबसिरीज प्रेक्षकांच्या भेटीस आली. या वेबसिरीजमध्ये मनीषा व्यतिरिक्त सोनाक्षी सिन्हा, अदिती राव हैदरी, संजिदा शेख, शर्मिन सेहगल, रिचा चड्ढा यांच्या मुख्य भूमिका आहेत. याशिवाय फरदीन खान, शेखर सुमन, अध्ययन सुमन, ताहा खान आणि फरीदा जलाल या कलाकारांनीही या वेबसिरीजमध्ये काम केलं आहे.

वेबसिरीज चर्चेत असली तरीही प्रेक्षकांकडून या सीरिजला संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. बहुतेक कलाकारांच्या अभिनयाचं कौतुक असलं तरीही धीम्या गतीने पुढे चालणारी कथा आणि भव्य दाखवण्याच्या नादात कथानकात आलेले अडथळे अनेकांना पटले नाहीयेत. आलमजेब ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री शर्मिन सेहगलचा अभिनय अनेकांना आवडला नाहीये तर काहींनी तिचं कौतुक केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: 'सोशल मीडिया'वर टास्क; गायीला खाऊ घातलं चिकन, बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी झोडपून काढला

Crime: आधी शरीराचे तुकडे केले; नंतर अर्धे बोअरवेलमध्ये फेकले तर बाकीचे...; मित्राचं तरुणासोबत क्रूर कृत्य, कारण काय?

Hair Donation: सोलापूरच्या सईने दाखवले मनाचे सौंदर्य! आजीच्या स्मृतिदिनी कॅन्सरग्रस्तांसाठी केले केशदान

Mumbai News: ओबीसी विद्यार्थ्यांसाठी मोठी घोषणा! ७ जिल्ह्यांत ६५ वसतिगृहे उभारली; पण कुठे? जाणून घ्या ठिकाणांची नावे...

'ती खंबीरपणे माझ्यासोबत उभी राहिली... या कमबॅकचं श्रेय तिचच...', Hardik Pandya ची 'मन की बात' ओठांवर आली... प्रेमाची कबुली

SCROLL FOR NEXT