Meenakshi Esakal
Premier

Meenakshi Seshadri : इंडस्ट्रीतील पुरुष कलाकारांच्या वर्चस्वावर मीनाक्षी शेषाद्रीचं वादग्रस्त वक्तव्य, "त्यांना घर,मूल सांभाळायचं नसतं"

Meenakshi Seshadri shared her controversial opinion on male dominance in bollywood : अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्री यांनी बॉलिवूडमधील पुरुषी वर्चस्वावर आणि स्त्री कलाकारांना मिळणाऱ्या वागणुकीबाबत त्यांचं ठाम मत व्यक्त केलं.

सकाळ डिजिटल टीम

Bollywood News : अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्री (Meenakshi Seshadri) बॉलिवूडमध्ये एकेकाळी गाजलेल्या नामांकित अभिनेत्रींपैकी एक आहेत. १ ९ ८ ० ला बॉलिवूडमध्ये करिअरची सुरुवात करणाऱ्या मीनाक्षी (Meenakshi Seshadri) यांनी एक दशक बॉलिवूडवर राज्य केलं. १ ९ ९ ६ साली त्यांनी लग्न करत बॉलीवूडला रामराम केला आणि त्या अमेरिकेला स्थायिक झाल्या. बॉलिवूडमधील त्यांच्या करिअरमध्ये त्यांनी अनेक दिग्गज अभिनेत्यांबरोबर स्क्रीन शेअर केली. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये त्यांनी बॉलिवूड इंडस्ट्रीमधील पुरुषी वर्चस्वावर आणि स्त्री कलाकारांना त्यांच्या करिअरमध्ये येणाऱ्या अडचणींबाबत भाष्य केलं.

पुरुष कलाकारांबाबत भाष्य

मीनाक्षी यांनी त्यांच्या काळातील आघाडीचे अभिनेते अमिताभ बच्चन(Amitabh Bachchan), धर्मेंद्र (Dharmendar) , सनी देओल (Sunny Deol) आजही कार्यरत असण्याबाबत त्यांचं मत व्यक्त केलं. पुरुष कलाकारांना घर सांभाळण्याची जबाबदारी नसते असं त्या यावेळी म्हणाल्या.

"हिरोला मुलांना वाढवायचं नसतं" - मीनाक्षी

लेहरन मेट्रो या चॅनेलला दिलेल्या मुलाखतीमध्ये मीनाक्षी यांनी म्हंटल कि,"पुरुष कलाकारांचं बॉलिवूड करिअर हे स्त्री कलाकारांपेक्षा अधिक असण्याची अनेक कारणं आहेत. अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, जितेंद्र ही पिढी अजूनही काम करते आहे. एक गोष्ट अशी आहे कि, पुरुष कलाकरांना घरची कामं करावी लागत नाहीत. ते पूर्णपणे त्यांच्या करिअरवर लक्ष देऊ शकतात. त्यांना प्रेग्नेंसी, मुलांची किंवा मुलांना वाढवण्याची जबाबदारी घ्यावी लागत नाही. या सगळ्या स्त्रियांच्या जबाबदाऱ्या असतात. म्हणूनच पुरुष कलाकार अजूनही त्याच ताकदीने त्यांचं काम करू शकतात. लोकं त्यांना पसंत करतात हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. "

इंडस्ट्रीत कमबॅक

यावेळी मीनाक्षी यांनी इंडस्ट्रीत काम करतेवेळीचे त्यांचे अनुभव त्यांनी शेअर केले. त्यांच्या सहकलाकारांविषयीच्या अनेक गोष्टी त्यांनी यावेळी सांगितल्या. त्यांनी सांगितलं कि, शत्रुघ्न सिन्हा आणि राजेश खन्ना हे खूप मुडी कलाकार होते पण त्यांच्याबरोबर काम करताना त्यांनी याची जाणीव कधी होऊ दिली नाही. तर त्यांनी त्यांच्या कमबॅकवरही भाष्य केलं. त्यांना जर एक उत्तम स्क्रिप्ट मिळाली तर नक्कीच त्या इंडस्ट्रीमध्ये कमबॅक करतील असं त्या यावेळी म्हणाल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde Reaction : ‘’मी जर पूर्ण दाढीवरून हात फिरवला असता, तर..’’ ; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा!

IND vs ENG 2nd Test: बॅट निसटली, विकेट गेली! Rishabh Pant च्या आक्रमणाला ब्रेक, मोडला ५९ वर्षांपूर्वीचा विक्रम, Viral Video

कसलं भारी! आईच्या वाढदिवसाला लेकीने आणला मालिकांचा केक; जन्मदात्रीचा आनंद गगनात मावेना, Video Viral

Ashadhi Wari: दिंडीत मोकाट जनावरांचा हल्ला; अनेकजण जखमी, चिमुकल्यांचाही समावेश

Bhor Police : ५८ पैकी २९ पोलिस कार्यरत, ५० टक्के जागा रिक्त; भोर पोलिस ठाण्याची स्थिती

SCROLL FOR NEXT