Vicky Kaushal Katrina Kaif  esakal
Premier

Vicky- Katrina: कतरीना कैफ -विकी कौशल यांच्या लग्नात फोन आणायला का होती बंदी; भाऊ सनी कौशलने सांगितलं कारण

Vicky Kaushal- Katrina Kaif Marriage: बॉलिवूड अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री कतरिना कैफ यांच्या लग्नात फोन आणण्यावर बंदी का होती याचं कारण समोर आलं आहे.

Payal Naik

Sunny Kausal On Vicky And Katrina Marriage: लोकप्रिय अभिनेत्री कतरिना कैफ आणि विकी कौशल ९ डिसेंबर २०२१ रोजी विवाहबंधनात अडकले. त्यांनी राजस्थान येथील एका हॉटेलमध्ये थाटामाटात लग्नगाठ बांधली. त्यांच्या लग्नात त्यांचे जवळचे नातेवाईक आणि मित्रपरिवार यांना आमंत्रण देण्यात आलं होतं. मात्र या लग्नात येणाऱ्या पाहुण्यांना मोबाइल फोन आणण्यास बंदी करण्यात आली होती. आता विकीचा भाऊ सनी कौशल याने एका मुलाखतीत त्यामागचं कारण सांगितलं आहे. त्यांचं लग्न आता पुन्हा एकदा चर्चेत आहे.

सनीने नुकतीच एक मुलाखत दिली. या मुलाखतीत बोलताना सनी म्हणाला, 'हा फक्त सुरक्षेचा आणि प्रायव्हसीचा प्रश्न नव्हता. तर तिथे उपस्थित असलेल्या सगळ्यांचा आनंद सगळ्यत जास्त महत्वाचा होता. तिथे असलेले सगळे त्या क्षणाचा आनंद घेत होते. त्यामुळे कोणालाही फोनची गरज पडली नाही. कुणाही फोन हातात घेतला नाही. व्हिडिओ काढले नाहीत. शेअर करण्याची घाई नाही. सगळे मनाने त्या लग्नाचा आनंद घेत होते.'

तो पुढे म्हणाला, 'माझे मित्र, नातेवाईक आणि कतरिनाचे नातेवाईक या सगळ्यांमध्ये घट्ट नाते तयार झाले आहे. आम्ही सगळ्यांनी एकमेकांबरोबर खूप मजा केली. एकमेकांबरोबर वेळ घालवताना तीन दिवस कसे गेले, याची जाणीवदेखील झाली नाही. इतरांपासून काहीतरी लपवण्याची किंवा काहीतरी दाखवण्याचे कोणतेही दडपण नव्हते. कोणत्याही दडपणाखाली लग्न होत नाही. फोन असल्याने किंवा कुणीतरी आपला व्हिडिओ काढतंय या भीतीखाली त्यांचं लग्नही व्यवस्थित झालं नसतं. वर वधू दोघेही सतत दडपणाखाली असते. त्यामुळे फोन आणण्यावर बंदी घातली होती.'

विकी-कतरिनाच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, विकी लवकरच संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘लव्ह अँड वॉर’ चित्रपटात अभिनय करताना दिसणार आहे. कतरिना ‘टायगर व्हर्सेस पठाण’ चित्रपटात आपल्या अभिनयाची झलक दाखवताना दिसणार आहे. तर सनी कौशल हा लवकरच ‘फिर आयी हसीन दिसरुबा’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court Crackers Ban : सर्वोच्च न्यायालयाचा फटाक्यांबाबत मोठा निर्णय; देशभरात बंदी घालता येणार नाही पण...

IND vs WI 2nd ODI : वादाला निमित्त! OUT or NOT OUT? नमन धीरचा अफलातून झेल, पण विंडीजला तो नाही पटला... Video पाहून ठरवा

Maratha Reservation: अंतरवालीमधील कोणी टीका केली तर दुर्लक्ष करा ; जरांगे . गावाचे योगदान विसरणार नाही

Latest Marathi News Live Update : काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी सिरीवेल्ली प्रसाद पाच दिवस मुंबई दौऱ्यावर; बैठकांना सुरुवात

OBC Development : ओबीसींच्या विकासासाठी एक रुपयांत जागा;उपसमितीच्या बैठकीत चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश

SCROLL FOR NEXT