Vicky Kaushal at Kapil Sharma Show 
Premier

Vicky Kaushal : विकीची झोपेत बडबड अन् सनी जेव्हा गटारात पडला.. कौशल भावंडांनी शेअर केल्या मजेशीर आठवणी; पाहा व्हिडिओ

Kapil Sharma Show : कपिलने त्या दोघांना विचारलं; "तुम्ही एकमेकांची अशी एक गोष्ट सांगा, जी तुमच्या भावाची लाजिरवाणी आठवण आहे पण त्या आठवणीने तुम्हाला खूप हसू येतं."

सकाळ डिजिटल टीम

Kaushal Brothers Share Funny Story : बॉलिवूडमधील फिल्मी भावंडं विकी आणि त्याचा भाऊ सनी कायमच त्यांच्या अभिनयामुळे आणि त्यांच्यातील बॉण्डिंगमुळे चर्चेत असतात. नुकतंच या दोघांनी 'द कपिल शर्मा शो'ला हजेरी लावली. यावेळी त्यांनी एकमेकांच्या मजेशीर गोष्टी शेअर केल्या. सोशल मीडियावर त्यांचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. (The Kapil Sharma Show)

कपिलने त्या दोघांना विचारलं; "तुम्ही एकमेकांची अशी एक गोष्ट सांगा, जी तुमच्या भावाची (Vicky Kaushal Brother) लाजिरवाणी आठवण आहे पण त्या आठवणीने तुम्हाला खूप हसू येतं." यावर उत्तर देताना विकी म्हणाला, "आम्ही लहान असताना आम्ही चाळीत राहायचो आणि मला आठवतंय, माझे वडील रोज ब्रेड आणायला सकाळी बाहेर जायचे. तर सनीला नेहमी त्यांच्यासोबत दुकानात ब्रेड आणायला जाणं आवडायचं. तेव्हा तो खूप लहान होता. बऱ्याचदा असं झालंय, की डॅड चालत पुढे गेले आहेत आणि त्यांनी मागे वळून बघितलंय आणि सनी गायब आहे. नंतर त्यांना तो गटारात सापडला आहे, आणि कुणालाच माहित नाही तो कसा तिथे पडला. माझी त्याच्याविषयीची आठवण अजूनही ताजी आहे आणि त्याला घरी आणल्यानंतर त्याच्यावर कायम पाणी ओतलं जायचं कारण हा कायम गटारात पडून यायचा आणि पूर्ण गटाराच्या घाणीने काळा झालेला असायचा."

तर विकीविषयीची आठवण सांगताना सनी (Sunny Kaushal) म्हणाला कि,"विकीला लहानपणी झोपेत बोलायची सवय होती. सामान्यतः लोकं झोपेत बरळतात. हा व्यवस्थित बोलायचा. पूर्ण परफॉर्मन्स द्यायचा. बऱ्याचदा आम्हाला कळायचं नाही कि हा झोपलाय कि जागा आहे? एकदा असंच झालं. मी झोपणार होतो आणि हा अर्धा-पाऊण तास आधीच झोपला होता आणि तो गाढ झोपेत होता. अचानक हा झोपेतून उठला, अंगावरची चादर बाजूला केली आणि मला म्हणाला,"चेक कर" तर मी विचारलं, "काय?" तर तो म्हणाला, "मी पेपर पूर्णपणे सोडवला आहे. तू चेक कर."

मग माझ्या लक्षात आलं हा झोपेत आहे आणि हा डोळे उघडे ठेवून हे सगळं बोलायचा. याला जर मी हलवलं असतं तर तो जागा झाला असता म्हणून मी ठरवलं याच्याशी गप्पा मारत राहावं. म्हणून मी उत्तर दिलं कि,"मी पेपर चेक केलाय. तुला १०० पैकी १०० मार्क्स मिळाले आहेत. आता झोप." सनीने ही आठवण सांगताच सगळ्यांना हसू अनावर झालं.

यावर विकीने सुद्धा आणखी एक आठवण शेअर केली. तो म्हणाला,"हे एकदा माझ्या आईसोबतही झालंय. मी झोपलो होतो आणि अचानक आईवर ओरडलो,"त्याने तुझी पर्स चोरली" आईला मी झोपेत आहे हे कळलं नाही आणि ती लगेच म्हणाली,"कोणी?""

सोशल मीडियावर त्यांचा हा व्हिडीओ सध्या खूप गाजतो आहे. नेटफ्लिक्सवर येणाऱ्या कपिलच्या या शोला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळतो आहे. विकी लवकरच लक्ष्मण उतेकर यांच्या 'छावा' या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT