Vicky Kaushal & Katrina Kaif Esakal
Premier

Vicky Kaushal : "आम्ही गुड न्यूज..." प्रेग्नेंसीच्या चर्चांवर विकी कौशल स्पष्टच बोलला ; कॅटरिनाच्या वाढदिवसाचे प्लॅन्स केले रिव्हील

Vicky Kaushal Talks About Pregnancy Rumors : अभिनेता विकी कौशलने सध्या कॅटरिना प्रेग्नेंट होणार असल्याच्या चर्चांवर भाष्य केलं.

सकाळ डिजिटल टीम

Vicky Kaushal & Katrina Kaif : बॉलिवूडमधील स्टार कपल विकी कौशल आणि कॅटरिना कैफ कायमच चर्चेत असतात. मध्यंतरी कॅटरिना प्रेग्नेंट असल्याची चर्चाही सोशल मीडियावर रंगली होती. याबाबत नुकतंच विकीने 'बॅड न्यूज' सिनेमाच्या प्रोमोशन दरम्यान खुलासा केला.

विकी कौशल म्हणाला...

बॅड न्यूज सिनेमाच्या प्रोमोशन दरम्यान विकीला कॅटरिनाच्या प्रेग्नेंसीबाबत आणि वाढदिवसाबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना विकी म्हणाला कि,"तुम्ही कॅटरिनाच्या वाढदिवसाविषयी प्रश्न विचारला हे खूप चांगलं केलं. तर तिचा वाढदिवस जवळ येतोय आणि प्रोमोशनमुले मला अजिबात वेळ मिळाला नाहीये. ती सुद्धा प्रवासात बिझी आहे. त्यामुळे टाईम स्पेंड करण्यावर मी भर देणार आहे आणि गुड न्यूज बाबत म्हणायचं झालं तर जेव्हा ती असेल तेव्हा निश्चितपणे आम्ही तुमच्या बरोबर नक्की शेअर करू. "

गेला बराच काळ कॅटरिनाच्या प्रेग्नेंसीच्या चर्चा सगळीकडे रंगल्या आहेत. त्यात तिचा सततचा परदेशात होणारा प्रवास आणि ढगळ कपड्यांमध्ये तिचं वावरणं यामुळे या चर्चांना आणखी हवा मिळाली होती पण आता विकीच्या स्पष्टीकरणामुळे या चर्चा थांबतील असा अंदाज आहे.

विकी, तृप्ती डिमरी आणि अॅमी विर्क यांची मुख्य भूमिका असलेला हा सिनेमा १९ जुलै २०२४ ला रिलीज होतोय. या सिनेमाची गाणी सोशल मीडियावर गाजत आहेत. 'तौबा तौबा' हे गाणं सध्या ट्रेंड करतंय तर विकी आणि तृप्तीवर चित्रित झालेल्या 'जानम' या गाण्यातील त्या दोघांच्या भन्नाट केमिस्ट्रीने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. याबरोबरच विकीचा या वर्षी 'छावा' हा सिनेमा रिलीज होणार असून तो संजय लीला भन्साळी यांच्या 'लव्ह अँड वॉर' या सिनेमातही काम करणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

मोठी बातमी! भाजपकडून ३ बड्या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी, राजकारणात खळबळ

SCROLL FOR NEXT