Vicky Kaushal Esakal
Premier

Vicky Kaushal: "त्यांनी जवळपास मला बदडलं..." ; गँग्स ऑफ वासेपुरच्या शुटवेळी विकीचा झालेला वाळू माफियांशी सामना

Vicky Kaushal Shared Horrifying Experince: अभिनेता विकी कौशलने गँग्स ऑफ वासेपूर या सिनेमावेळी त्याला आलेला भयंकर अनुभव शेअर केला.

सकाळ डिजिटल टीम

Gangs Of Vasseypur : अभिनेता विकी कौशल सध्या 'बॅड न्यूज' या सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमातील त्याचं 'तौबा तौबा' हे गाणं गाजतच आहे. त्याचा या सिनेमातील डान्सही खूप गाजतोय. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये विकीने गँग्ज ऑफ वासेपूर सिनेमादरम्यानचा एक किस्सा शेअर केला. वाळू माफियांपासून मार खाता खाता विकी वाचला होता आणि पोलिसांनीही त्या अटकही केली असती असा खुलासा एका मुलाखतीत केला.

नुकतंच विकीने तन्मय भटच्या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. यावेळी त्याने या सिनेमावेळेचा किस्सा शेअर केला. गँग्ज ऑफ वासेपूर सिनेमासाठी विकीने असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केलं होतं. अनुराग कश्यपने हा सिनेमा दिग्दर्शित केला होता.

हा किस्सा सांगताना विकी म्हणाला कि,"चित्रपटात कोळसा तस्करीचा जो सीन आहे, तो खरा आहे. आम्ही तो शूट केला होता. पण वाळू तस्करीचा सीन शूट करायचा होता त्यावेळी आमच्यासोबत एक घटना घडली. जेव्हा आम्ही तो सीन शूट करण्यासाठी गेलो, तेथील दृश्य पाहिल्यानंतर मला धक्का बसला, कारण तिथे फक्त दोन ट्रक नव्हते, तर ५०० ट्रक होते. ते पाहिल्यावर तुम्हाला असं वाटणारच नाही की, हे सगळं बेकायदेशीररित्या चालू आहे, इतक्या उघडपणे वाळूची तस्करी चालू होती. आम्ही गुपितपणे तो सीन शूट करत होतो आणि तेवढ्यात काही लोक आमच्याजवळ आले. ५०० लोकांनी आम्हाला वेढा घातला होता. जो कॅमेरामॅन होता, त्याचं वय ५० हुन जास्त होते. आम्ही अडकलोय, कॅमेरा वेळेत पोहोचू शकत नाही, हे सांगण्यासाठी त्याने युनिटला फोन केला. त्याचं फोनवरील बोलणं ऐकून एका माणसाला वाटलं कि, आम्ही कोणालातरी बोलावण्यासाठी फोन केलाय आणि कॅमेरामॅनला कानाखाली मारली. त्यानंतर त्यांनी कॅमेरा हिसकावून घेतला आणि कॅमेरा फोडून टाकेन अशी धमकी द्यायला सुरूवात केली. आम्ही त्यादिवशी वाळमाफियांकडून जवळजवळ मार खाणारच होतो पण तिथून आम्ही निसटलो."

तर याच सिनेमाचा आणखी एक किस्सा सांगताना तो म्हणाला कि,"आमच्याकडे एका व्हॅनमध्ये कॅमेरा होता आणि आम्ही बनारस स्टेशनवर शूटिंग करत होतो. शॉट असा होता की, नवाजुद्दीन सिद्दीकी स्टेशनच्या बाहेर येईल, सायकल रिक्षात बसेल आणि निघून जाईल. पण आम्ही छुप्या कॅमेराने शूटिंग करत असलो तरीही आम्हाला एक चांगला शॉट पाहिजे होता. त्यादरम्यान दोन पोलिस कॉन्स्टेबल आमच्याकडे बोट दाखवत तुम्ही कोण आहात, असं विचारत असलेले दिसले. त्यानंतर मी व्हॅनचा वेग वाढवायला सांगितला. अशा अनेक किस्स्यांमधुन गँग्स ऑफ वासेपूर हा सिनेमा बनला."

अनुराग कश्यप यांच्याबरोबर नंतर विकीने मनमर्जिया या सिनेमात काम केलं. या सिनेमात तो तापसी पन्नू आणि अभिषेक बच्चन यांच्याही मुख्य भूमिका होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL, Video: CSK विरुद्ध RCB चा सामना विराट कोहलीला सर्वात जास्त का आवडतो? म्हणाला, 'त्यांचे फॅन्स बंगळुरूत....'

Solapur : काँग्रेससह शरद पवारांना धक्का; भगीरथ भालके, अनिल सावंत शिवसेनेच्या वाटेवर; DyCM शिंदेंच्या उपस्थितीत प्रवेशाची शक्यता

सत्ताधारी पक्षाचा नेता तरुणीसोबत नको त्या अवस्थेत; सापडताच कुठे पळू झालं? शेतातून....

Solapur Ambedkar Jayanti: बुद्धिजीवी भीमप्रेमींना साेलापूरात हवीय एकत्रित मिरवणूक; डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव, मध्यवर्तीचा बुधवारी होणार निर्णय!

Latest Marathi News Live Update : टोलानी कॉलेजमध्ये विद्यार्थ्याचा मृत्यू, इतर विद्यार्थी आक्रमक; प्राचार्याच्या निलंबनाची मागणी

SCROLL FOR NEXT