Vicky Kaushal sakal
Premier

Vicky Kaushal: 'छावा' चित्रपटाचं शूटिंग झालं पूर्ण; विकी कौशल खास पोस्ट शेअर करत म्हणाला,"शेवटचा सीन शूट केला अन्..."

Vicky Kaushal: 'छावा' या चित्रपटात विकी हा छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण झालं आहे.

priyanka kulkarni

Vicky Kaushal: अभिनेता विकी कौशलच्या (Vicky Kaushal) छावा या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत आहेत. काही दिवसांपूर्वा या चित्रपटाच्या सेटवरील विकी कौशलचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. या फोटोमधील विकीच्या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले. अनेकांनी त्याच्या लूकचं कौतुक देखील केलं आहे. या चित्रपटात विकी हा छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण झालं आहे. अशातच शूटिंगच्या शेवटच्या दिवशी सेटवर पावसानं हजेरी लावली. विकी कौशलनं नुकतीच एक पोस्ट शेअर करुन छावा चित्रपटाच्या शूटिंगच्या शेवटच्या दिवसाबद्दल सांगितलं.

विकी कौशलची पोस्ट

विकीनं एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये पाऊस पडताना दिसत आहे. या व्हिडीओला त्यानं कॅप्शन दिलं, "'छावा' चित्रपटाच्या शूटिंगचा कमालीचा उत्कट आणि नाट्यमय प्रवास ड्रामाशिवाय संपूच शकत नव्हता.आम्ही आमच्या चित्रपटाचा शेवटचा सीन शूट केल्यानंतर लगेचच पाऊस आला. मला याबद्दल खूप काही सांगायचे आहे, या प्रवासाबद्दल मी आत्ताच सांगू शकत नाही. कदाचित काही दिवसांनी मी याबद्दल सांगू शकेल. मी आता कृतज्ञतेने आणि प्रेमाने भरलेल्या अंतःकरणाने सांगू शकतो की, छावा चित्रपटाचे शूटिंग संपले आहे."

Vicky Kaushal

विकीनं एक फोटो देखील सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यामध्ये भगवा झेंडा फडकताना दिसत आहेत. या फोटोला विकीनं "जय भवानी, जय शिवाजी" असं कॅप्शन दिलं आहे.

Vicky Kaushal:

छावा या चित्रपटात विकीसोबतच रश्मिका मंदाना आणि संतोष जुवेकर हे कलाकार देखील महत्वाची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात रश्मिका ही येसूबाई भोसले यांची भूमिका साकारणार आहे. प्रेक्षक या चित्रपटाची उत्सुकतेने वाट बघत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW Live: भारतीय संघाचे T20 World Cup मधून पॅकअप! ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय अन् दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत... हरमनप्रीत कौरच्या संघाला अपयश

IND vs IRE 2nd T20I : आयर्लंडने इतिहास रचला! भारतीय संघाला ट्वेंटी-२० मालिकेत नमवले, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाची लाजीरवाणी सुरुवात

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर वाढला मृत्यूचा धोका! टोल टाळण्यासाठी 'नो-एंट्री'तून वाहनांची सर्रास एंट्री; नियमांना हरताळ

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Vidarbha Rain Alert : विदर्भासाठी दिलासादायक बातमी! पावसाचा जोर वाढणार, ११ जिल्हे यलो अलर्टवर

SCROLL FOR NEXT