Vicky & Katrina Esakal
Premier

Katrina Kaif Birthday : विकी कौशलचे बायकोसाठी कौतुकाचे शब्द, वाढदिवसाला पोस्ट केलं असं काही...

Vicky Post For Katrina : आज अभिनेत्री कतरीना कैफचा वाढदिवस आहे. यानिमित्त तिचा नवरा विकीने एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली.

सकाळ डिजिटल टीम

Vicky Kaushal & Katrina Kaif : चाळीशी ओलांडलेली बॉलीवुड अभिनेत्री कतरिना कैफवर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव होतोय. वाढदिवसानिमित्त सोशल मिडीयावर कतरिनाला शुभेच्छा दिल्या जात आहेत. यातच एका खास व्यक्तिकडून कतरिनाला मिळालेल्या शुभेच्छा लक्ष वेधून घेत आहेत. ही व्यक्ति दुसरी तिसरी कुणी नसून कतरिनाचा पती अभिनेता विकी कौशल आहे.

कतरिनाच्या वाढदिवसानिमित्त विकी कौशलने सोशल मिडीयावर खास पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये विकी कौशलने कतरिनासोबतचे काही खास क्षण असलेले फोटो शेयर केले आहेत. या फोटोंमध्ये दोघांच्या खास एकत्र आठवणी पाहायला मिळत आहेत. सोबतच कॅप्शनमध्येही विकीने कतरिनासाठीचं प्रेम व्यक्त केलं आहे. विकी या पोस्टमध्ये लिहीतो की, "तुझ्यासोबत आठवणी बनवणं हे माझ्या आयुष्यातील सगळ्यात आवडता भाग आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा माझं प्रेम."

या फोटोंमध्ये विकी आणि कतरिना एकमेकांसोबत किती आनंदी आहेत हे पाहायला मिळतय. दोघांच्या रिलेशनशीपमधील काही खास क्षण या फोटोंमध्ये पाहायला मिळत आहेत. विकी कौशल आणि कतरिना कैफ यांच्या वयात पाच वर्षांचं अंतर आहे. २०२१ मध्ये ९ डिसेंबर रोजी विकी आणि कॅटने लगीनगाठ बांधली होती. राजस्थान येथे काही जवळच्या मित्रपरिवाराच्या उपस्थितीत दोघांचा विवाहसोहळा पार पडला होता.

एका चॅट शोमध्ये कतरिना आणि विकी कौशल एकत्र दिसले होते. शिवाय एका अवॉर्ड शो दरम्यानही त्यांचा गमतीशीर संवाद झाला होता. 'कॉफी विथ करण' या शोमध्ये कतरिनाने विकी कौशलच्या कामाचं कौतुक केलं होतं. तर याच शोमध्ये विकी कौशलला कतरिनाने केलेल्या कौतुकाविषयी कळले आणि त्याने हटके प्रतिक्रिया दिली होती. त्यानंतर विकी आणि कतरिना अनेक कार्यक्रमात एकत्र दिसू लागले होते. दोघांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आलं होतं.

कतरिना आणि विकी कौशल ही बॉलीवुडची पसंत केली जाणारी ऑफस्क्रिन जोडी आहे. मात्र दोघं ऑनस्क्रिन कधी एकत्र झळकतील याविषयी सगळ्यांना उत्सुकता आहे.

'मेरी ख्रिसमस' या चित्रपटानंतर कतरिनाच्या आगामी चित्रपटाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. तर विकी कौशलच्या 'बॅड न्यूज' या चित्रपटाची सध्या चर्चा आहे. या चित्रपटातील 'तौबा तौबा' हे गाणं मोठ्या प्रमाणात चर्चेत आलं असून सोशल मिडीयावर या गाण्याचे डान्स रील व्हायरल होताना दिसत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lawyer Rakesh Kishor: मोठी बातमी! सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलावर कारवाई; बार कौन्सिलने घेतला मोठा निर्णय

Kannad Nagarparishad Election : कन्नड नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिलांसाठी राखीव; शहरात ‘भावी वहिनीसाहेब’ ताईसाहेब चर्चेत

Latest Marathi News Live Update : खासदर शोभाताई बच्छाव यांचा पाचोरा तालुक्यातील पाहणी दौरा पूर्ण

Dombivali News : दिवा स्वतंत्र पोलीस ठाण्याचा विषय मार्गी लावा; मनसे नेते राजू पाटील यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

By-elections in Seven States : बिहार निवडणुकीसोबतच सात राज्यातील आठ विधानसभा जागांसाठी पोटनिवडणुकीची घोषणा!

SCROLL FOR NEXT