vijay varma sakal
Premier

कसे शूट झाले 'मिर्झापूर २'मधील विजय वर्मा आणि श्वेता त्रिपाठी यांचे इंटिमेट सीन? अभिनेता म्हणतो- जेव्हा तिने बेल्टने..

Vijay Varma On Mirzapur 2: अभिनेता विजया वर्माने 'मिर्झापूर २' मधील आपल्या इंटिमेट सीनबद्दल खुलासा केला आहे.

Payal Naik

'मिर्झापूर ३' ही वेबसीरीज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सीरिजची प्रेक्षकांमध्ये प्रचंड चर्चा आहे. यावेळेस सीरिजमध्ये काय पाहायला मिळणार, नवीन कोण असणार, पटकथा काय असणार, मागील कलाकारांचं काय होणार असे एकना अनेक प्रश्न प्रेक्षकांना पडले आहेत. अशातच अभिनेता विजय वर्मा याची एक मुलाखत चाहत्यांमध्ये व्हायरल होतेय. या मुलाखतीत त्याने त्याच्या 'मिर्झापूर २' मधील इंटिमेट सीनवर भाष्य केलं आहे. ते सीन कसे शूट झालेले हे त्याने सांगितलं आहे.

पार्टनरकडून बऱ्याच गोष्टी शिकतो

'मिर्झापूर 2' मध्ये विजय वर्मा आणि श्वेता त्रिपाठी यांचे काही इंटीमेट सीन्स होते. 'न्यूज १८'ला दिलेल्या मुलाखतीत बोलताना हे सीन कसे शूट झाले याबद्दल बोलताना विजय म्हणाला, 'तुम्ही सगळ्या गोष्टी स्वतः नाही शिकू शकत. आपण आपल्या पार्टनरकडून बऱ्याच गोष्टी शिकतो. जेव्हा तुम्ही ती गोष्ट करत असता किंवा त्या गोष्टीचा अनुभव घेता तेव्हा ती एक वेगळी एनर्जी असते आणि तेव्हा तुम्ही मुलाचे पुरुष होता.'

विजय म्हणाला, 'जेव्हा गोलू (श्वेता त्रिपाठी) छोटे त्यागी (विजय वर्मा) ला बेल्ट देऊन बोलते की मार, तर तो स्व:तला मारू लागतो. मी जेव्हा ही कल्पना दिली होती तेव्हा दिग्दर्शिक गुरमीत सिंग हसू लागले होते. मग मी त्यांना सांगितलं की ही जी भूमिका आहे त्याला माहीत नाही की मुलीला काय अपेक्षित आहे. जेव्हा तिसऱ्या सीझनचं शूटिंग सुरु होतं तेव्हा सेटवर इंटीमेसी कॉर्डिनेटर देखील उपस्थित होते. तर इंटिमेसी कॉर्डिनेटक असल्यानं शूटच्या वेळी एक प्रोटेक्टेड वातावरण तयार होतं. तुम्ही सेटवर एकटे नसता.'

तो पुढे म्हणाला, 'हे कोणत्याही दुसऱ्या मूव्हमेंट किंवा मग टचवर अवलंबून असतं. हे एक एक्सरसाइजसारखी आहे. डान्स आणि अॅक्शन सीक्वेंसप्रमाणेच सेक्शुअल सीन्स असतात. या तिघांची तयारी करणं गरजेचं असतं. तुम्ही तुमच्या डोक्याने काही करत नाही. सगळं तिथे बसलेले इन्स्ट्रक्टर ठरवतात.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW Live: भारतीय संघाचे T20 World Cup मधून पॅकअप! ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय अन् दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत... हरमनप्रीत कौरच्या संघाला अपयश

IND vs IRE 2nd T20I : आयर्लंडने इतिहास रचला! भारतीय संघाला ट्वेंटी-२० मालिकेत नमवले, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाची लाजीरवाणी सुरुवात

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर वाढला मृत्यूचा धोका! टोल टाळण्यासाठी 'नो-एंट्री'तून वाहनांची सर्रास एंट्री; नियमांना हरताळ

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Vidarbha Rain Alert : विदर्भासाठी दिलासादायक बातमी! पावसाचा जोर वाढणार, ११ जिल्हे यलो अलर्टवर

SCROLL FOR NEXT