Virat and Anushka Esakal
Premier

Viral Video : 'ग्रीन फ्लॅग नाही ग्रीन फॉरेस्ट'; लेकाला कडेवर घेतलेल्या किंग कोहलीचा व्हिडीओ व्हायरल, नेटकरी म्हणाले...

Virat Kohli Spotted With Akaay : क्रिकेटर विराट कोहलीचा लंडनमधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

Virat Kohli : टी २० विश्वकप जिंकल्यानंतर क्रिकेटर विराट कोहली सध्या व्हेकेशनसाठी लंडनला रवाना झाला आहे. विश्वकप जिंकून भारतात परत आल्यावर काही काळातच विराट त्याच्या कुटूंबाला भेटण्यासाठी लंडनला गेला. नुकताच विराट आणि त्याची पत्नी अनुष्काचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये पहिल्यांदाच विराटचा लेक अकायचीही झलक पाहायला मिळाली.

नुकतंच विराट आणि त्याच्या पूर्ण कुटूंबाला पापाराझींनी लंडनमध्ये स्पॉट केलं. ई टाईम्सने हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. विराट, अनुष्का त्यांच्या मुलांबरोबर लंडन शहरामध्ये फिरत होते. त्यावेळी त्यांचा हा व्हिडीओ शूट करण्यात आला. या व्हिडिओमध्ये पाहायला मिळालं कि, विराटने त्याचा मुलगा अकायला कडेवर घेतलं असून ते सगळेजण एका फुलांच्या दुकानापाशी थांबले आहेत आणि अकाय बाबांच्या कडेवरून दुकानाबाहेर सजवण्यात आलेली फुलं पाहत आहे. वामिकाही तेथे उपस्थित होती पण क्लिपमध्ये ती झाडाच्या आड असल्यामुळे दिसत नाहीये. ,,,Anushka Sharma

सोशल मीडियावर कोहली कुटुंबाचा हा व्हिडीओ गाजत असून अनेक युजर्सनी विराटच्या कुटूंबवत्सल स्वभावाचं कौतुक केलं. युझर्सनी या व्हिडिओवर कमेंट करत 'विराट फक्त मुलींसाठी ग्रीन फ्लॅग नाही तर पूर्ण ग्रीन फॉरेस्ट' आहे असं म्हंटलं. तर अनेकांनी या व्हिडिओवर कमेंट करत विराट आणि अनुष्काचं कौतुक केलं असलं तरीही त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात हस्तक्षेप करू नका असा सल्ला युजर्सनी पापाराझींना दिला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

काही दिवसांपूर्वीच त्यांचा लंडनमधील एक कीर्तन ऐकतानाच व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत होता. लंडनमधील एका थिएटरमध्ये पार पडलेल्या या कार्यक्रमाला विराट आणि अनुष्काने हजेरी लावली होती.

विराट आणि अनुष्का त्यांच्या मुलांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत सजग असून ते त्यांना प्रसिद्धीपासून लांब ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांचे चेहरेही अजून त्यांनी सोशल मीडियावर उघड केले नाहीयेत. तर मध्यंतरी विराट आणि अनुष्का कायमचे लंडनला स्थायिक होणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या पण याबाबत अजून कोणतीही ठोस बातमी समोर आली नाहीये.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Disconnect Bill: कार्यालयीन वेळेनंतर ऑफिसच्या कॉल आणि ईमेलला उत्तर द्यावे लागणार नाही! संसदेत मांडलेलं ‘डिस्कनेक्ट राईट’ बिल नेमकं काय?

ना भूकंप, ना पाऊस... तरी खचला राष्ट्रीय महामार्ग, स्कूलबससह अनेक गाड्या अडकल्या

Latest Marathi News Live Update : चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायांनी रस्ता रोखला

ज्वालामुखी, नैसर्गिक आपत्ती अन् ... 2026 बाबत पुराणात नेमकं काय लिहिलंय, भविष्यवाणी कलियुगासाठी ठरत आहेत खरी? वाचा धक्कादायक सत्य!

Mahaparinirvan : कशी होती डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची अंत्ययात्रा? लाखोंची गर्दी अन् अश्रुधारा, महापरिनिर्वाण दिनाचा हृदयस्पर्शी व्हिडिओ

SCROLL FOR NEXT