vishakha subhedar social media Post Ram Nagarkar Kala Gaurav Award maharashtrachi hasya jatra Marathi entertainment news  
Premier

Vishakha Subhedar News : "महाराष्ट्राची हास्यजत्रा सोडलं याचा अर्थ...", विशाखाच्या 'त्या' पोस्टने वेधलं लक्ष

Vishakha Subhedar Social Media Post News : नुकतंच विशाखाने शेअर केलेल्या पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

सकाळ वृत्तसेवा

Vishakha Subhedar Latest News : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा', 'कॉमेडी एक्सप्रेस' , 'फु बाई फु' यांसारख्या शो मधून प्रेक्षकांना खळखळून हसवत त्यांचं मनोरंजन करणारी अभिनेत्री म्हणजे विशाखा सुभेदार. उत्तम कॉमेडी सेन्स आणि अचूक टायमिंगच्या जोरावर विशाखाने आजवर अनेक स्किट्स गाजवले आहेत. सोनी मराठीवरील महाराष्ट्राची हास्यजत्रामधील समीर-विशाखाची जोडी चांगलीच गाजली होती. आजही त्यांचे स्किट्स सोशल मीडियावर व्हायरल होतात.

अनेकजण विशाखाने पुन्हा एकदा हास्यजत्रामध्ये परतावं अशी इच्छा व्यक्त करताना दिसतात. मध्यंतरी विशाखाने तिला सध्या काही काळ कॉमेडीपासून दूर राहणार असल्याचं म्हंटल होतं. त्यामुळे तिचे चाहते निराश झाले होते.

पण तिच्या विनोदीच नाही तर गंभीर भूमिकाही गाजल्या. शुभविवाह या स्टार प्रवाहावरील मालिकेत ती साकारत असलेल्या रागिणी या व्यक्तिरेखेने सगळ्यांची मनं जिंकून घेतली. खलनायकी ढंगाची असलेली ही भूमिका चांगलीच गाजतेय आणि विशाखाचा अभिनयसुद्धा सगळ्यांना पसंत पडतो. आणि नुकतंच विशाखाने शेअर केलेल्या पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं.

विशाखाला नुकताच राम नगरकर पुरस्काराने गौरवण्यात आलं. सोशल मीडियावर पोस्टच्या माध्यमातून विशाखाने तिच्या भावना व्यक्त केल्या. ती म्हणते,"राम नगरकर पुरस्कार सोहळा...2024 हा पुरस्कार ह्या माझ्या गुरु स्थानी असलेल्या दोन सचिन मास्तर ह्यांच्याकडून मिळाला हे ही माझं भाग्य. हा पुरस्कार देण्याचे ज्यांनी ठरवलं ते वंदन नगरकर हे हयात नाही ह्याचे मात्र वाईट वाटले. फु बाई फु ते हास्यजत्रा.. विनोदी प्रहसन सादर करीत आले, त्याची शाबासकी मिळाली. पुरस्कार म्हटलं कीं जबाबदारी आलीच.. जरी हास्यजत्रा तुन बाहेर पडले ह्याचा अर्थ असा नाही होत कीं विनोदी अभिनय करण सोडलं.. एक ब्रेक घेतला होता पुन्हा एखाद्या विनोदी भूमिकेत दिसेनच... रसिकांचे आणि नगरकर कुटुंबियांचे खुप आभार.. 🙏🙏" सोबत तिने या सोहळ्याचे फोटोज सुद्धा शेअर केले.

अनेकांनी तिचं या पुरस्कारासाठी अभिनंदन केले. कॅप्शनमध्ये विशाखाने पुन्हा एकदा विनोदी भूमिका साकारण्याची इच्छा व्यक्त केलेली पाहून अनेकजण खुश झाले आणि आता ती कोणत्या नव्या विनोदी भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार हे जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत. विशाखाचं सध्या रंगभूमीवर कुर्र्रर्र्र हे नाटक खूप गाजतंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT