Kangana Ranaut sakal
Premier

Kangana Ranaut: कंगनाला कानशि‍लात लगावणाऱ्या सीआयएसएफ जवान कुलविंदर कौर यांना नोकरी देणार 'हा' स्टार; पोस्टनं वेधलं लक्ष

The Social Media post attracted attention: चंदीगड विमानतळावर कुलविंदर कौर नावाच्या CISF च्या महिला जवानाने (Kulwinder Kaur CISF Constable) कंगनाच्या कानशि‍लात लगावली.

priyanka kulkarni

Kangana Ranaut: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आणि भाजपची नेता कंगना रणौत (Kangana Ranaut) नेहमी कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. काल (6 जून) चंदीगड विमानतळावर कुलविंदर कौर नावाच्या CISF च्या महिला जवानाने (Kulwinder Kaur CISF Constable)  कानशि‍लात लगावली. या प्रकरणाची चर्चा आता सोशल मीडियावर होत आहे. अशातच आता एका सेलिब्रिटींनी या प्रकरणाबाबत एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

विशाल ददलानीची पोस्ट

कंगना रणौतसोबत घडलेल्या चंदीगड विमानतळावरील घटनेबाबत विशालनं पोस्ट केली. या पोस्टमध्ये त्यानं लिहिलं, "मी कधीही हिंसेचे समर्थन करत नाही, परंतू सीआयएसएफ जवानाच्या रागाची गरज मला पूर्णपणे समजली. सीआयएसएफ जवानावर कोणतीही कारवाई केल्यास, त्यांना नोकरी संधी मिळेल, याची मी खात्री करेन, जर त्यांनी ती स्वीकारली तर. जय हिंद. जय जवान. जय किसान." विशालच्या या पोस्टची सध्या चर्चा होत आहे.

Kangana Ranaut

संपूर्ण घटनेबद्दल जाणून घ्या

गुरुवारी कंगना रणौत दिल्लीला जाण्यासाठी फ्लाइट पकडण्यासाठी चंदीगड विमानतळावर पोहोचली. कंगना विमानतळाच्या बोर्डिंग पॉईंटवर गेल्यावर तेथे उपस्थित असलेल्या सीआयएसएफ अधिकारी कुलविंदर कौरनं तिच्या कानशिलात लगावली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या घटनेनंतर कुलविंदर कौर यांना निलंबित करण्यात आले असून त्यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

नेमकं कारण काय?

कंगनानं शेतकरी आंदोलनादरम्यान केलेल्या विधानामुळे महिला सीआयएसएफ जवानाने तिच्या कानशि‍लात लगावली, असं म्हटलं जात आहे.

कंगनानं नुकतीच लोकसभा निवडणूक लढवली आहे. कंगनाचा या निवडणुकीत दणदणीत विजय झाला. कंगनानं हिमाचल प्रदेशमधील मंडी लोकसभा मतदारसंघातून भाजप या पक्षातून निवडणूक लढली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT