vishay hard movie review  sakal
Premier

Vishay Hard Review: १२ वर्षांचं प्रेम मिळवायला फक्त ५ तास; कसा आहे पर्ण पेठे, सुमित यांचा 'विषय हार्ड' चित्रपट?

Vishay Hard Movie Review: गमतीशीर आणि सफाईदार मांडणीअसलेला 'विषय हार्ड' चित्रपट कसा आहे?

Santosh Bhingarde

कोरोनाचा काळ हा महाभयंकर होता. आजही तो काळ आठवला की अंगावर शहारे येतात. या काळात कित्येकांना आपला जीव गमवावा लागला तर काही जणांना आपल्या रोजीरोटीस मुकावे लागले. काही जणांची लव्हस्टोरी याच काळात खुलली तर काही जणांनी आपल्या लग्नाचे बार याच काळात उडविले. आता प्रदर्शित झालेल्या विषय हार्ड या मराठी चित्रपटाची कथा याच काळातील आहे. एका ग्रामीण भागात घडणारी ही कथा गमतीशीर पद्धतीने मांडण्यात आली आहे. आपल्या ग्रामीण भागातील इरसाल अशा विविध व्यक्ती आणि वल्ली यांची ही गोष्ट.

ही कथा डाॅली आणि संद्या यांच्या भोवती फिरणारी असली तरी अन्य व्यक्तिरेखाही तितक्याच महत्त्वाच्या आहेत. विशेष बाब म्हणजे दिग्दर्शक सुमितने प्रत्येक व्यक्तिरेखा अशा पद्धतीने गुंफली आहे की चित्रपट पाहताना तो कंटाळवाणा वाटत नाही. डाॅली (पर्ण पेठे)ही आपल्या आई-वडिलांसह राहात असते. ती शिकली सवरलेली असते आणि आता तिच्या लग्नाचे वय झालेले असते. त्यामुळे तिचे आई-वडील तिला साजेसा नवरा शोधत असतात. परंतु डाॅलीचे संद्या (सुमित)वर प्रेम असते. ते बालपणीचे मित्र-मैत्रिणी असतात आणि तेव्हापासून त्यांच्यामध्ये प्रेमाचे धागे फुललेले असतात. परंतु संद्या पुण्याला पैसे कमावण्यासाठी गेलेला असतो.

तो पुण्याहून आपल्या गावी येतो त्यावेळी कोरोना सगळीकडे पसरलेला असतो. साहजिकच सरकारी नियमाप्रमाणे तो आणि त्याचे मित्र यांना क्वारंटाईन केले जाते. दरम्यानच्या काळात डाॅलीच्या घरी तिच्या लग्नाची बोलणी सुरू होते. ही बाब संद्याला समजताच तो क्वारंटाईनमधून पळ काढतो आणि त्यानंतर कशा व कोणत्या गमतीजमती घडतात ते प्रत्यक्ष पडद्यावर पाहिलेले बरे. दिग्दर्शक व लेखक सुमितने एक सरळ आणि साधी प्रेमकथा उत्तम प्रकारे बांधली आहे. कोरोनाच्या काळातील खेडेगावातील परिस्थिती कशी होती...तेथील लोकांचा कोरोनाच्या बाबतीत दृष्टिकोन कसा काय होता, गावचा पोलिस पाटील आणि पोलिस कर्मचारी यांची त्यावेळी धावपळ कशा प्रकारे चाललेली होती.

त्यातच एक तरुण व तरुणी प्रेमकथा वगैरे बाबी चपखलपणे मांडलेल्या आहेत. दिग्दर्शक सुमितने ही कथा सुंदररीत्या खुलवली आहे. त्यामुळे चित्रपट उत्कंठावर्धक झाला आहे. या चित्रपटमध्ये कोणतेही मोठे कलाकार नाहीत वा अव्वाच्या सव्वा खर्च या चित्रपटावर करण्यात आलेला नाही. तरीही चित्रपट गमतीशीर झाला आहे. अभिनेता सुमित, पर्ण पेठे, हसन शेख, विपीन बोराटे. नितीन कुलकर्णी, प्रताप सोनाळे, भूमी पाटील, चैत्राली इनामदार, आनंद बल्लाळ आदी कलाकारांनी उत्तम कामगिरी केली आहे. मात्र अधिक कौतुक करावे लागेल ते हसन शेख आणि नितीन कुलकर्णी यांचे.

नितीन कुलकर्णी यांनी साकारलेला पोलिस पाटील तसेच हसन शेखने साकारलेली श्रीन्या या भूमिका चित्रपटामध्ये चांगलाच हशा निर्माण करतात. या दोन्ही भूमिकांमुळे चित्रपट अधिक गमतीशीर झाला आहे. पर्ण पेठे आणि सुमित यांनी आपापल्या भूमिकेचे बेअरिंग छान पकडले आहे. त्याचबरोबर अन्य कलाकारांनीदेखील तितकीच चोख कामगिरी केली आहे. चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी सुंदर झाली आहे. त्याचे श्रेय अभिषेक शेटे आणि जय पारीख यांना द्यावे लागेल. या कथेला संगीतकार साहिल कुलकर्णीने चांगला संगीत साज चढविलेला आहे.

पूर्वार्धात चित्रपटाची गती छान आहे. त्यामुळे चित्रपट चांगली पकड घेतो. मात्र उत्तरार्धात चित्रपटाची गती काहीशी संथ झाली आहे. पटकथेवरील ताबा सुटलेला दिसत आहे. शिवाय स्माॅल बजेटचा चित्रपट असल्यामुळे तांत्रिक बाबीमध्ये चित्रपट कमकुवत झाला आहे. मात्र लेखक व दिग्दर्शक सुमितचा हा पहिलाच चित्रपट आहे आणि त्याने चांगला प्रयत्न केला आहे. एक गमतीशीर कल्पना असलेल्या या चित्रपटाची मांडणी सफाईदार झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpati Visarjan 2025 Live Updates : परळच्या राजाची गुलाल उधळत मिरवणूक; लालबागचा राजाही मंडपातून निघाला...

Satara Ganpati Visarjan Video : भगवान शंकराची कृपा? मामाच्या डोक्यावर सुरक्षित नाचतो गणपती! पाहा अद्भुत क्षण

Latest Maharashtra News Updates : त्रिभाषा धोरण निश्चितीसाठी सरकारकडून समिती सदस्यांची नियुक्ती

TET Exam : टीईटी बंधनकारक, प्रमोशन नाहीच; सरकारच्या भूमिकेनंतर शिक्षण विभाग काढणार आदेश

Chandra Gochar 2025: 7 सप्टेंबरपासून 'या' राशीचे नशीब बदलेल, आर्थिक संकटातून मिळेल मुक्तता

SCROLL FOR NEXT