vivek oberoi salman khan  esakal
Premier

कुठेही जा पण... लॉरेन्स- सलमान वादात विवेक ओबेरॉयचा तो व्हिडिओ व्हायरल; नेटकरी म्हणाले- शत्रूचा शत्रू आपला

Vivek Oberoi Video Went Viral About Bishnoi Community : लोकप्रिय बॉलिवूड अभिनेता सलमान खान याला बिष्णोई समाजाने धमकी दिल्यानंतर आता विवेक ओबेरॉय याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Payal Naik

राष्ट्रवादीचे नेते आणि माजी आमदार बाबा सिद्दीकी यांना त्यांच्याच ओफिससमोर गोळ्या घालून मारण्यात आलं. या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिष्णोई टोळीने घेतली. असं असलं तरी बाबा सिद्दीकी यांची हत्या का झाली हे अजूनही समोर आलेलं नसलं तरी त्यांच्या हत्येचा संबंध सलमान खानशी असलेली मैत्री असं म्हटलं जातंय. सलमानला इशारा देण्यासाठी ही हत्या घडवून आणली गेली. मात्र अशातच आता बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉय याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ज्यात तो बिष्णोई समाजाचं कौतुक करताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकरी निरनिराळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

हा व्हिडिओ २०२३ मधील आहे जेव्हा विवेक दुबईमध्ये गेला होता. तेव्हा तिथल्या एका कार्यक्रमात त्याने बिष्णोई समाजाचं कौतुक केलं होतं. या व्हिडिओमध्ये तो म्हणतो, 'गुगलवर बिश्नोई समुदाय शोधण्याचा प्रयत्न करा, असं दृश्य तुम्हाला जगात कुठेही पाहायला मिळणार नाही. आमच्यासह प्रत्येक घरात आम्ही मुलांना गायीचे दूध पाजतो. संपूर्ण जगात एकच समुदाय आहे, बिष्णोई समुदाय, जिथे हरणाच्या बाळाची आई मरण पावली तर बिश्नोई समाजातील एक माता आपल्या कुशीत घेऊन त्याला स्वतःचं दूध पाजत आहे. अगदी तसंच जसं ते स्वतःच्या मुलांना दूध पाजतात. हे तुम्हाला जगात कुठेही पाहायला मिळणार नाही.'

सलमान आणि बिष्णोई यांच्यात शत्रुत्व आहेच पण सलमान आणि विवेक याचं शत्रुत्वदेखील जगजाहीर आहे. ऐश्वर्या रायसोबतच्या नात्यामुळे सलमानने त्याला त्रास दिल्याचा आरोप विवेकने केला होता. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने लिहिलं, 'शत्रूचा शत्रू, लॉरेन्सचा मित्र.' दुसऱ्या एकानं लिहिलंय की, 'अरे तो त्याचा बदला घेत आहे...' आणखी एकानं लिहिलंय की, 'सलमान खानचा सबसे बडा दुश्मन...'. आता बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर विवेकचा हा व्हिडिओ व्हायरल होतोय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur politics: मोहिते-पाटील पिता-पुत्रांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट; साेलापूर जिल्ह्यात नव्या समीकरणांची शक्यता!

Women writers and kitchen representation in literature : स्वयंपाकघरातील अनुभवांचे साहित्यिक दर्शन: स्त्री लेखिकांची भूमिका

Ahilyanagar News: अहिल्यानगरमध्ये महापौरपदाच्या आरक्षणाची प्रतीक्षा; इच्छुकांची फिल्डिंग, ‘स्वीकृत’साठीही मोर्चेबांधणी, पुढील आठवड्यात हालचाली!

Solapur Accident:भाविकांवर काळाचा घाला! भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू, दाेन महिला जखमी; सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील घटना..

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 18 जानेवारी 2026

SCROLL FOR NEXT